शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 मे 2021 (16:12 IST)

करुणा धनंजय मुंडे उलगडणार प्रेमकथा; फेसबुक पोस्ट

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. आपली प्रेमकथा पुस्तक रुपात प्रकाशित करणार असल्याचे करुणा यांनी फेसबुक पोस्टमधून जाहीर केले आहे. त्यामुळे करुणा यांच्या वैयक्तिक जीवनातील कुठल्या गोष्टी वाचायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यानिमित्ताने धनंजय मुंडे यांचे खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
 
करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलंय, ‘माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे.’
 
महत्त्वाचे म्हणजे करुणा यांच्या बहिणीने (रेणू शर्मा) धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंवर खासगी आयुष्याबद्दल खुलासा करण्याची वेळ आली होती. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातून खुलासा करत, ‘तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीने मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत’, अशी कबुली दिली होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र तक्रार मागे घेतल्यानंतर हा वाद शमला होता. मात्र आता करुणा धनंजय मुंडे यांनी पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे जाहीर केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान, गेली 25 वर्षे आपण घराबाहेर पडलो नाही. पण गेल्या 2 महिन्यांपासून घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं कोर्टानं मला बोलण्यास मनाई केली आहे. मात्र जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडेन, असा इशारा करुणा यांनी याआधीच दिला होता.