गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (11:20 IST)

केरळ:एका रिक्षा चालकाचं उजळलं नशीब, 12 कोटीची लॉटरी लागली

Kerala: Luck of a rickshaw driver
केरळमधील एका ऑटो ड्रायव्हरला 12 कोटी रुपयांची बंपर लॉटरी लागली आहे. लॉटरीच्या तिकिटाद्वारे ऑटो ड्रायव्हरने ही एवढी रक्कम जिंकली आहे. सांगितले जाते की लॉटरीचा निकाल ओणमच्या दुसऱ्या दिवशी घोषित करण्यात आला.त्यात भाग्यवान विजेते म्हणून कोचीजवळील मराडूच्या जयपाल पीआरला लॉटरी लागली. रविवारी जाहीर झालेल्या निकालाच्या विजेत्याचा लॉटरी तिकीट क्रमांक TE 645465 आहे.
 
निकाल जाहीर झाल्यानंतर जयपालन यांनी पत्रकारांना सांगितले की,"मी 10 सप्टेंबर रोजी त्रिपुनीतुरा येथून हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. मला समजले की तो एक फॅन्सी नंबर आहे.12 कोटी रुपयांच्या लॉटरीमधून कर भरल्यानंतर वाहन चालकाला 7 कोटी रुपये मिळतील.