शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

नवर्‍याच्या पासपोर्टची बनवली फोन डायरी, व्हिसा लावत असलेल्या जागेवर लिहिले मोबाइल नंबर

एके काळी अनेक लोकांना डायरी असायची ज्यात नातेवाईक आणि मित्रांचे फोन नंबर लिहिले असायचे. हल्ली मोबाइलमुळे हे दिवस कुणाला आठवत देखील नसतील. परंतू केरळच्या एका महिलेने केलेलं काम सर्वांना आश्चर्यात टाकणारे ठरेल.
 
येथील एक महिलेने नातेवाईक आणि मित्रांचे नंबर जतन करू ठेवण्यासाठी मोबाइल तर सोडाच डायरी देखील न वापरता सरळ आपल्या नवर्‍याचा पासपोर्ट वापरला. महिलेने सर्व नंतर नवर्‍याच्या पासपोर्टवर लिहिले. ज्या जागी व्हिसा लागतो त्या जागेवर नंबर लिहून काढले.
 
भूपिंदर सिंग नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर ही माहिती देत म्हटले की आईने वडिलांच्या पासपोर्टवर मोबाइल नंबर लिहिले आहेत. मलयालम भाषेत ही माहिती देत तो म्हणाला की याचा व्हिडिओ शेअर करता येणार नाही कारण त्यावर अनेक लोकांचे मोबाइल नंबर आहे अर्थातच खाजगी माहिती शेअर करणे योग्य नाही.