मंगळवार, 16 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By

आधार कार्ड हरवले, मग हे वाचा

Lost the Aadhaar card
अनेकदा आधार कार्ड हरवले की परिस्थिती गंभीर होते. अशा वेळी काय करावे या विचाराने गोंधळायला होते. मात्र आता हरवलेले आधार कार्ड एका मेसेजद्वारे लॉक करता येणार आहे. यूआयडीएआयने आणलेल्या नव्या फिचरद्वारे तुम्ही आधार नंबर लॉक किंवा अनलॉक करता येणार आहे. 
 
आधार कार्ड लॉक करण्यासाठी कार्ड धारकाला १९४७ या क्रमांकावर ‘GETOTP’ असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. ओटीपी मिळाल्यानंतर कार्ड धारकाने ‘LOCKUID’ असे लिहून एक स्पेस द्यावा. पुढे आधार नंबर आणि मिळालेला ओटीपी लिहून तो मेसेज १९४७ या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर आधार नंबर लॉक करण्यात येईल.
 
आधार नंबर लॉक केल्यानंतर तो काही वेळा नंतर पुन्हा अनलॉक देखील करता येतो.  रजिस्टर असलेल्या मोबाईलनंबर वरुन ‘GETOTP’ असे लिहून १९४७ या क्रमांकावर मेसे पाठवा. त्यानंतर  मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यात येईल. तो व्हेरिफाय झाल्यानंतर पुन्हा ‘UNLOCKID’ असे लिहून पुढे आधार नंबर लिहा. हा मेसेज पुन्हा १९४७ या क्रमांकावर पाठवा. काही वेळातच आधार नंबर पुन्हा अनलॉक होईल.