गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (17:06 IST)

प्रियकराचं पत्र: करिश्मा मेरी है, वऱ्हाडीला धमकीच पत्र, गुन्हा दाखल

प्रेम हे असं आहे की प्रेमासाठी लोक काहीही करतात. एकतर्फी प्रेम असेल तर जीव घेतात आणि देतातही. एकतर्फी प्रेमात एका वेड्या तरुणाने प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने धमकीचे पत्र लिहून घरातील भिंतीवर चिटकवले. नवरदेवाच्या घरातील लोकांनी हे पत्र वाचल्यावर त्यांना धक्काच बसला. या पत्रात वऱ्हाडी आणि होणाऱ्या नवरदेवाला धमकवणाऱ्या गोष्टी लिहिल्या होत्या.वरच्या कुटुंबियांनी पोलिसांना या पत्राची माहिती दिली. पोलिसांनी धमकवणाऱ्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . या वेड्या आशिकाचे धमकीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील सिंभोली कोतवाली भागातील फरीदपूर गावाशी संबंधित आहे. जिथे मॉन्टी सिंग 18 फेब्रुवारी रोजी करिश्मासोबत लग्न करणार आहे. पण  अज्ञाताने ने आपल्या उग्र मित्रांसह वराला धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी  मॉन्टी सिंग आणि शेजाऱ्यांच्या घराबाहेर धमकीचे पत्रक चिकटवले.त्यात लिहिले '' कान उघडून ऐका, मोंटू सिंग, नवरदेव, करिष्मा माझी आहे. वरात घेऊन येऊ नकोस , तुला जिवंत सोडणार नाही , वऱ्हाडीला श्मशानात पाठवेन. ज्याला लग्नाच्या जेवणात गोळी खायची आहे त्यांनीच वऱ्हाडीत यावे. आता मी फक्त एक छोटासा ट्रेलर दाखवत आहे. संपूर्ण चित्रपट वरातीत दाखवेन. एवढेच नाही तर त्याने पेट्रोल बॉम्ब फेकून पिस्तुलातून तीन राउंड फायर केले. आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही जागे झाले. यानंतर  मॉन्टी सिंग घाबरला आणि त्याने पोलिस ठाणे  गाठले. आतापर्यंत धमकी देणाऱ्या अज्ञाताचा शोध लागलेला नाही. मात्र तो लवकरच आमच्या ताब्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
Edited By - Priya Dixit