सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 18 मार्च 2021 (16:15 IST)

देशात सर्वाधिक करोडपती कुटुंबे महाराष्ट्रात

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कुटुंब करोडपती असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशात 2 कोटी 98 लाख 95 हजार 338 अशी कुटुंबे आहेत की ज्यांची मालमत्ता 7 कोटींपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 56 हजार कुटुंबे ही  करोडपती आहेत. हुरुन इंडियाज वेल्थ रिपोर्ट -2020 नुसार महाराष्ट्रानंतर सर्वाधिक करोडपती कुटुंब उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि गुजरातमध्ये आहेत. देशातील एकूण करोडपती कुटुंबांपैकी 46 टक्के या पाच राज्यांमध्ये आहेत.