शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (00:04 IST)

टीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक

नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये घालवतात हे समोर आले आहे. भारतीय यूजर्स आठवड्यातील ऑनलाइन व्हिडीओ कंटेन्ट बघण्यात सरासरी 8 तास 28 मिनिटे इतका वेळ खर्च करतात. तर हेच लोक टीव्ही बघण्यात आठवड्यातील 8 तास 8 मिनिटे इतका वेळ घालवतात. रिपोर्टनुसार, 'जितका वेळ भारतीय यूजर्स ऑनलाइन व्हिडीओ बघण्यात घालवतात, हे प्रमाण जागतिक प्राणापेक्षा अधिक आहे. हेच जागतिक प्रमाण 6 तास 45 मिनिटे इतकं आहे. ऑनलाइन चॅनल्समध्ये भारतीय प्रेक्षक सर्वात जास्त सिनेमे बघतात. त्यानंतर ऑनलाइन बघितल्या जाणार्‍या गोष्टींमध्ये न्यूज, टीव्ही शो आणि खेळ यांचा समावेश आहे.