रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

इजिप्तमधील दगडापासून बनलेल्या गूढ मूर्ती

इजि‍प्तमधील लक्झर शहरातून वाहणार्‍या जगप्रख्यात नाइल नदीच्या काठावर शेकडो वर्षांपासून मानवाच्या आकाराच्या दोन मूर्ती आहेत. स्थानिक लोक त्यांना 'क्लॉसी ऑफ मॅमनॉन' म्हणून ओळखतात. असे असले तरी मॅमनॉन्सशी त्यांचा कोणताही संबंध नाही. या महाकाय मूर्ती 3400 वर्षांपेक्षा जास्त प्राचीन आहेत. इजिप्तचा राजा फैरा एमनहोटॅप तृतीयच्या या मूर्ती असून गुडघ्यावर हात ठेवलेल्या मुद्रेतील या मूर्तीच्या जवळच त्याची आई व पत्नीच्याही छोट्या आकाराच्या मूर्ती आहेत. प्राचीन इजिपप्तमधील सगळ्यात मोठ्या मंदिराबाहेर या मूर्ती साकारण्यात आल्या होत्या. त्याच्या या अवस्थेमागे अनेक कारणे सांगितली जातात. काही लोकांच्या मते, नाईल नदीला आलेल्या पुरात मंदिर नष्ट झाले असावे. सुमारे 13 फुटांच्या चबुतर्‍यावर 60 फूट उंचीच्या या मूर्ती आहेत. त्यांच्यात 50 फुटांचे अंतर असून त्यांचे वजन सुारे 1400 टनांपर्यंत असण्याचा अंदाज आहे. ज्या दगडापासून या मूर्ती बनल्या आहे, तो मात्र या भागात कुठेच आढळत नाही. असा दगड 675 किमी अंतरावरील कैरोमध्ये दिसतो. त्यामुळे त्याकाळी एवढे विशाल दगड लोकांनी कसे काय आणले असतील, हे एक कोडेच ठरले आहे. नाइल नदीच्या जलमार्गाने ते आणले असतील तर त्यासाठी किती मोठी नाव लागली असेल? अनेक संशोधनातूनही या प्रश्र्नांची उत्तरे सापडू शकलेली नाहीत.