सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (10:18 IST)

नाना पाटेकर - अमित शाहा यांची भेट

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर दोघांनी बंद दाराआड चर्चा केल्याने ही भेट नेमकी का झाली असावी यामागचे कारण समजू शकलेले नाही.
 
दोन दिवसांपूर्वीच अभिनेते नाना पाटेकर यांनी कोल्हापूर आणि सांगली येथे जाऊन पूरग्रस्तांच्या वेदना जाणून घेतल्या. कोल्हापूरकरांची, सांगलीकरांची दुःख अमित शाह यांच्या कानावर घालून लवकरात लवकर मदत पाठवण्यासंदर्भात त्यांनी विनंती केली का? हे समजू शकलेले नाही. नाना पाटेकर यांच्या राजकीय एन्ट्रीची याआधीही बरीच चर्चा झाली होती.
 
मात्र, त्यांनी यास नकार देत राजकारणात प्रवेश करण्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. मात्र, आज शहांच्या भेटीमुळे पुन्हा नाना पाटेकर चर्चेत आले आहेत. पाटेकर यांनी अमित शहा यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. यानंतर त्यांनी ही भेट खासगी होती, राजकीय नव्हती असे सांगितले आहे. शहा यांना भेटण्याआधी पाटेकर यांनी अंतर्गत सुरक्षा विशेष अधिकारी यांची भेट घेतली.
 
सोशल मीडियावरही या भेटीसंदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये संसदेच्या आवारातून नाना पाटेकर अमित शाह यांच्या कार्यालयाकडे जाताना दिसत आहेत. दिल्लीत नाना पाटेकर आले आणि त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली मात्र ती भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती हे अद्याप कळू शकलेलं नाही.