मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2019 (10:28 IST)

'मोदी' जगातील सर्वात शक्तीशाली नेते

लंडनमधील ‘ब्रिटिश हेराल्ड’ या मासिकाने घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘२०१९ मधील जगातील सर्वात शक्तीशाली नेते’ असल्याचा कौल वाचकांनी दिला आहे. या सर्वेक्षणामध्ये ३०.९० टक्के वाचकांनी असे मत नोंदविले आहे.
 
या सर्वेक्षणामध्ये जगभरातील एकूण २५ मोठ्या व्यक्तींच्या नावांचा समावेश होता. या सर्वेक्षणामधील प्रथामिक टप्प्यांनंतर तज्ज्ञांच्या समितीने चार जणांचा अंतिम फेरीसाठी निवड केली होती. वाचकांच्या मतांबरोबर संबंधित व्यक्तींसंदर्भात अभ्यास आणि अहवाल तयार करुन मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याचे ‘ब्रिटिश हेराल्ड’ने म्हटले आहे. या सर्वेक्षणात मोदींना ३०.९० टक्के, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना २९.९० टक्के, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २१.९० टक्के तर चीने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना १८.१० टक्के मते मिळाली आहेत.