शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जुलै 2020 (18:14 IST)

आता कोरोनापासून बचाव करेल नेकलेस, नासाने तयार केला अनोखा हार

जगभरात कोरोनाने थैमान घातले असून यामुळे आतापर्यंत लाखोंचा मृत्यू झाला आहे. अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात अनेक कंपन्या लस शोधण्याचा दावा करत असल्या तरी पूर्णपणे यश हाती आले नाही. दरम्यान अमेरिकन अंतराळ अॅजसी नासाने एक अनोखा नेकलेस तयार केला आहे. 
 
कोरोनापासून बचावासाठी नेकलेस कामास येईल असा दावा करण्यात येत आहे. याला पल्स असे नाव देण्यात आले आहे.जसे की सर्वांनाच ठाऊक आहे की हात धुणे, चेहरा, नाक, डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे असा सल्ला डॉक्टर्स किंवा तज्ज्ञांद्वारे वारंवार दिला जात आहे. नासाने हेच लक्षात ठेवत खास नेकलेस तयार केले आहे. याची विशेषता म्हणजे आपण आपले हात जसेच चेहर्‍याजवळ घेऊन जाला हे वायब्रेट करू लागेल ज्याने आपल्याला चेहर्‍यावर हात लावणे टाळायचे आहे असे संकेत मिळतील.
 
हे आगळे-वेगळे नेकलेस नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबमध्ये तयार केले गेले आहे. याला थ्री-डी प्रिंटरच्या साहाय्याने तयार केले गेले आहे. खरं तर या हारमध्ये शिक्क्याचा आकाराचे डिव्हाईस आहे ज्यात इंफ्रारेड सेंसर लागलेले आहे. हे सेंसर 12 इंच पर्यंत जवळपास कोणतीही वस्तू आल्यास वायब्रेट करू लागतं. यात तीन वॉल्टची एक बॅटरी देखील लागलेली आहे.
 
जेट प्रॉपल्शन लॅबप्रमाणे कोरोनाची लस सापडेपर्यंत हे वापरलं जाऊ शकतं. कारण हळू-हळू सर्वांना आपल्या कामावर परत जायचे आहे अशात पल्स त्यांची मदत करेल. याची किंमत अधिक नसल्यामुळे खरेदी करणे सोपे जाईल. तसेच हे घालणे अवघड नाही.
 
तरी नेकलेस घातल्याने इतर खबरदारी घेण्याची गरज नाही असे समजणे चुकीचे ठरेल. याला मास्कचा पर्याय म्हणून वापरू नये. सोबतच हात धुणे, अनावश्यक वस्तूंना स्पर्श करणे टाळावे.