गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : मंगळवार, 9 जानेवारी 2024 (13:04 IST)

New Gautami Patil : नव्या गौतमी पाटील ची सर्वत्र चर्चा कोण आहे ही!

Tanushree PuneKar
tanushree Instagram
गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना असून तिचे कार्यक्रम नेहमी गाजतात. गौतमी कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा नेहमी गोंधळ असतो. 

आता गौतमीसारखी दिसणारी आणि तिचा सारखा डान्स करणाऱ्या एका तरुणीची सध्या चर्चा होत आहे. ती गौतमी पाटील सारखा डान्सचं करत नाही तर ती गौतमी सारखी दिसते. अखेर कोण आहे ही  तरुणी. या तरुणीने नृत्याच्या क्षेत्रात दमदार एंट्री केली असून ती उत्तम नृत्य करते. लोकांना या तरुणीने वेड लावले आहे. हिचे नाव आहे तनुश्री पुणेकर. ही एक उत्तम नृत्यांगना आहे. एवढेच नाही तर ती दिसायला देखील गौतमी पाटील सारखी आहे. तिचे हावभाव देखील गौतमी सारखे वाटतात.तिच्या नृत्याने तरुण वर्गाला चांगलेच वेड लावले आहे.

तनुश्रीच्या डान्सचे व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्राम वर शेअर केले आहे. तिने त्यात म्हटले आहे की "मी तनुश्री पुणेकर मी विंनती करते की मला कोणीही डुप्लिकेट गौतमी पाटील म्हणू नका. मला तनुश्री पुणेकरच म्हणावे. आणि तसेच प्रेम द्यावे. आपण दिलेल्या प्रेमासाठी मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद "
 तिच्या व्हिडिओवर अनेकांनी कॉमेंट्स दिले आहे. तर काहींनी तिला गौतमी पाटीलची बहीण असे देखील म्हटले आहे. तर काहींनी तिला गौतमीची कॉपी केल्याचे म्हणत टीका केली आहे. 

Edited by - Priya Dixit