सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 28 एप्रिल 2018 (15:44 IST)

'त्या' डॉक्टरकडून फेसबुकला दोन कोटीची नोटीस

मुंबईतील एका प्लास्टिक सर्जनने त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट अचानकपणे बंद केल्याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याला दोन कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. डॉ. देबराज शोम असे त्या डॉक्टरचे नाव असून त्यांनी ३ मार्च रोजी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जेट एअऱवेजवर टीका केली होती. त्यानंतर काही मिनीटातंच त्यांचे इंस्टाग्रामचे अकाऊंट बंद करण्यात आले.
 
डॉ. देबराज हे फेसबुक व इंस्टाग्रामवर सक्रीय होते. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या लहान मोठ्या गोष्टी, तसेच त्यांच्या क्षेत्रातील माहिती ते इंस्टाग्रामवर शेअर करायचे. त्यांना इंस्टाग्रामवर तब्बल २५ हजार युजर्स फॉलो करत होते. ३ मार्च रोजी देबराज हे हैदराबादवरून मुंबईला जेट एअरवेजने परतत होते. त्यावेळी बोर्डिंगच्या ठिकाणी त्यांच्याकडील सामानाचे वजन ठरवून दिलेल्या वजनापेक्षा जास्त असल्याचे सांगत त्यांना त्यासाठी अतिरिक्त पैसे भरण्यास सांगितले. देबराज यांनी पैसे भरण्यासाठी त्यांचे कार्ड दिले मात्र त्या काऊंटरवरची स्वाईप मशीन बंद असल्याने त्यांना दुसऱ्या काऊंटरवर जिथे रोख पैसे घेण्याची सोय होती त्या रांगेत थांबण्यास सांगितले. त्यानंतर मुंबईला परतल्यावर देबराज यांनी इंस्टाग्रामवर त्यांचा अनुभव शेअर केला. त्यानंतर काही मिनीटातंच त्यांचे इंस्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले.
 
याप्रकरणी देबराज यांनी इंस्टाग्रामच्या सीईओ व मुख्य टेक्नोलॉजी अधिकाऱ्याला इमेल पाठवून विचारणा केली. मात्र त्यांना काहीच रिप्लाय आला नाही. त्यामुळे त्यांनी कायद्याची मदत घेत फेसबुकला व फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला नोटीस बजावून त्यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी दोन कोटींची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.