शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जून 2018 (09:00 IST)

प्रणवदावर थेट त्यांच्या मुलीनेही उघड नाराजी व्यक्त केली

Pranabda expressed
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी होण्यावर आता थेट त्यांच्या मुलीनेही उघड नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी देत आहात असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलं आहे. ट्वि़टरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या वडिलांना थेट सुनावलं आहे.
 
‘आजच्या घटनेवरुन भाजपा किती घाणेरडं राजकारण करत आहे याची तुम्हाला कल्पना आली असेल अशी अपेक्षा. तुमचं भाषण विसरलं जाईल, फक्त व्हिजुअल्स राहितील. खोटी वक्तव्यं जोडून तुमचे व्हिजुअल्स परसवले जातील’,असा थेट आरोपच शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आरएसएसवर केला आहे.
 
पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘नागपूरला जाऊन तुम्ही भाजपा आणि आरएसएसला खोट्या बातम्या पेरण्याची आणि अफवा पसरवण्याची संधी देत आहात. ही फक्त सुरुवात आहे’अस म्हटल आहे.