मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जुलै 2019 (09:29 IST)

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील बनल्या मिसेस इंडिया

pune lady police officer
पुण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावलाय. रनिंग मिसेस इंडिया 2019 किताब त्यांनी पटकावला. देशभरातील महिलांना मागे सारत प्रेमा पाटील यांनी मानाचा किताब पटकावला. प्रेमा पाटील या विशेष शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करतात. फेसबुकच्या माध्यमातून त्यांना सौंदर्य स्पर्धेची माहिती मिळाली आणि त्यांनी तयारी सुरू केली. प्रेमा पाटील यांना मैदानावर पोलीस परेडची सवय होती. मात्र रॅम्पवर चालण्याचा त्यांना काही अनुभव नव्हता. त्यांना समस्या भेडसावत होती ती म्हणजे हाय हिल्सच्या चपलांची. मात्र घरी आल्यानंतर त्यांनी रात्री हाय हिल्सच्या चपला घालून सराव केला. त्याचबरोबर नृत्य नृत्य आणि आपल्या बुद्धीच्या बळावर त्यांनी यश मिळवलं. 
 
प्रेमा पाटील या मूळच्या कराडच्या असून त्यांचं शिक्षण एम.कॉम पर्यंत झालं आहे. गेल्या 9 वर्षांपासून प्रेमा पाटील या पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत. सध्या त्या पुणे पोलीस दलातील विशेष शाखेत कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यासोबत समाज कार्याची आवड असल्याने प्रेमा पाटील या कार्बोनरी या सामाजिक संस्थेसोबत गरीब आणि गरजू मुलांना मदत करत असतात.