1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (09:15 IST)

मिठी मारल्याचे पक्षातील अनेकांना आवडले नाही : राहुल गांधी

rahul gandhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभेत मिठी मारल्याचं पक्षातील अनेक नेत्यांना आवडलं नव्हतं असा खुलासा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. जर्मनीमधील हॅमबर्ग येथे बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतात रोजगाराची मोठी समस्या आहे, मात्र पंतप्रधान त्याकडे गांभीर्याने पाहण्यास नकार देतात असा आरोपही केला.
 
‘तुम्ही समस्या असल्याचं मान्य करत त्यावर उपाय केला पाहिजे’,असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. यावेळी राहुल गांधींनी भारत आणि गेल्या ७० वर्षातील विकासावरही भाष्य केलं.
 
यावेळी आपल्या प्रसिद्ध गळाभेटीवरही ते बोलले. लोकसभेत चर्चेदरम्यान राहुल गांधींनी जागेवरुन उठून जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतल्यानेच ती गळाभेट चांगलीच गाजली होती. ‘जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली तेव्हा माझ्या पक्षातील अनेकांना ते आवडलं नव्हतं’,असं त्यांनी सांगितलं