राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?

raj thackare  panipat
Last Modified गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (15:24 IST)
सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपट रिलीज होत आहेत. या आगोदर बाजीराव मस्तानी, पद्मावत, मणिकर्णिका असे एकामागोमाग एक ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि यशस्वी देखील झाले. त्यानंतर आता ‘पानिपत’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबदद्ल टि्वटकरून सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.
‘पानिपत’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट उद्या म्हणजेच शुक्रवार ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गोवारीकरांच्या खांद्यावर या ऐतिहासिक चित्रपटाची धुरा असल्यामुळे मराठी भाषिकांमध्येही सिनेमाविषयी उत्सुकता आहे. त्यातच राज ठाकरे यांनी ‘पानिपत’ चित्रपटाचं कौतुक केल्यामुळे या ऐतिहासिक महानाट्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे आतुर झाले आहेत.
‘पानिपतची लढाई ही मऱ्हाठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणाऱ्या मरहट्ट्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटेकापार झेंडा नेणारी मऱ्हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पहावंच लागेल. त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी देखील पहायला हवा’, असं आवाहन राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन केलं आहे.
पानिपत’ चित्रपटात सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अर्जुन कपूर, पार्वतीबाईंच्या भूमिकेत क्रिती सॅनन तर अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त पाहायला मिळणार आहे. अजय- अतुल यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. पानिपत’ हा चित्रपट पानिपतमध्ये झालेल्या तिसऱ्या लढाईवर आधारित आहे. मराठा साम्राज्य आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात झालं होतं. 1761 मध्ये हरियाणातील पानिपतच्या मैदानावर झालेल्या या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

अरविंद केजरीवाल यांचे भाजपाविरुद्ध मौन बाळगण्याचे हे रहस्य ...

अरविंद केजरीवाल यांचे भाजपाविरुद्ध मौन बाळगण्याचे हे रहस्य आहे काय?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद यांचे केजरीवाल सध्या शांतता राखून आहेत. पंतप्रधान नरेंद्र ...

आव्हाड यांचा 'हा' फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड ...

आव्हाड यांचा 'हा' फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल
मुंबईतील मनीषा नगर येथील नागरिकांसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे ...

मुनगंटीवार यांचा अजित पवार यांना टोला

मुनगंटीवार यांचा अजित पवार यांना टोला
“नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण सध्याच्या परिस्थितीवर तंतोतंत खरी ठरली आहे. राज्यातील ...

घटनाबह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल

घटनाबह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल
सरकारकडून कोणतीही घटनाबह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल, असे वक्तव्य ...

राज यांची पदाधिकाऱ्यांना सुचना मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू ...

राज यांची पदाधिकाऱ्यांना सुचना मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली ...