रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जून 2018 (08:43 IST)

मॅडम तुसाद संग्रहालयात आता रामदेव बाबा

योगगुरू आणि पतंजली योगपीठाचे रामदेव बाबा आता जगप्रसिद्ध मॅडम तुसाद संग्रहालयात दिसणार आहेत. लवकरच त्यांचाही मेणाचा पुतळा दिल्लीतील मॅडम तुसाद संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. यासाठी सध्या लंडनमध्ये असलेले रामदेव बाबा यांची मॅडम तुसादच्या पथकाने भेट घेऊन त्यांचे माप घेतले, तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावही टिपले आहेत. रामदेव बाबांचा मेणाचा पुतळा संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. हा मेणाचा पुतळा वृक्षासन मुद्रेत असेल. 
 
दिल्लीतील मॅडम तुसाद संग्रहालयाचे सात भाग बनवण्यात आले आहेत. रामदेव बाबांचा पुतळा फन अँड इंटॅरक्टिव्ह विभागात ठेवण्यात येणार आहे. येथे येणारे प्रेक्षक पुतळ्याबरोबर सेल्फीही घेऊ शकतील. दरम्यान, पुतळा तयार करण्यासाठी रामदेव बाबांचे २०० हून अधिक छायाचित्रे घेण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावरील विविध भाव टिपण्यात आले.