1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 मार्च 2018 (10:58 IST)

यंदा मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होणार

manse

मनसेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात येणार आहे. १८ मार्चला होणाऱ्या या मेळाव्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मनसेला मिळालेल्या आहेत.  
मनसेच्या १२ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे घोषणा करणार आहेत. सदरचा कार्यक्रम मुंबईतील  वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला २०१६ पासून सुरूवात करण्यात आली होती. मात्र गेल्यावर्षी चिरंजीव अमित यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरे यांनी पाडवा मेळावा रद्द केला होता. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणेच मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला आता सुरूवात झालीय.