testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आता बोला राफेल बद्दल काय बोलणार - शिवसेना

Last Modified शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (09:02 IST)
राफेल प्रकरण रोज नवीन प्रश्न निर्माण करत आहेत. भाजपा सरकारवर जोरदार टीका विरोधक करत आहेत. तर भाजपाचा मित्र पक्ष शिवसेना तर एकही संधी सोडत नसून जोरदार टीका करत आहे. शिवसेनेन पुन्हा राफेल प्रकरणावर प्रश्न विचारले असून, सुप्रीम कोर्टाने व्यवहार माहिती विचारली तेव्हा काय उत्तर देणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. आता काय लपवणार आणि काय सांगणार असे सुद्धा शिवसेना विचारात आहेत. राफेल प्रकरणी सरकारला रोज नवीन प्रश्न विचारले जात असून त्यामुळे अनेक अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रात पुढील मुद्दे विचारले गेले आहेत.
सुप्रीम कोर्टानेच आता राफेल व्यवहाराची माहिती मागितल्याने राजकारणाला अधिक धार चढेल व त्यामुळे संरक्षण खात्याची प्रतिष्ठा अडचणीत येईल. राफेल प्रकरणात लपवण्यासारखे आता काहीच उरले नाही. जे लपवायचे होते त्या अवास्तव वाढवलेल्या किमतीचाच भांडाफोड झाला. आधी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी एका गालावर मारली व आता फ्रान्सच्या मीडियाने दुसऱ्या गालावर सणसणीतपणे मारली. राफेलचे नाणे खणखणीत नाही. त्यामुळे सरकारी प्रवक्त्यांनी थोडा दम खाऊन बोलावे हेच बरे. इकडचे तिकडचे सांगण्यापेक्षा राफेलच्या वाढलेल्या किमतीवरच बोला.
सुप्रीम कोर्टानेच राफेल खरेदी नक्की कशी झाली याची माहिती मागवल्याने सरकारची गोची झाली आहे. आता सुप्रीम कोर्ट काही राहुल गांधी किंवा त्यांच्या काँग्रेसच्या मुठीत नाही. राफेल लढाऊ विमान खरेदीचे भूत मोदी सरकारच्या मानगुटीवर बसले आहे. भाजपच्या किंवा सरकारच्या प्रवक्त्यांनी कितीही जंतर मंतर व चेटूकगिरी केली तरी हे भूत इतक्यात खतम होईल असे वाटत नाही. बोफोर्स तोफा खरेदीच्या बाबतीत जे घडले तेच राफेलच्या बाबतीत घडताना दिसत आहे. राफेलचा विषय देशाच्या संरक्षणाशी संबंधित असल्याने त्याविषयीची माहिती देता येणार नाही. राहुल गांधींना काय कळतेय? ते मूर्खशिरोमणी आहेत. राहुल गांधी जी माहिती मागत होते, तीच माहिती आता सुप्रीम कोर्टाने मागितली आहे. हवाई दलासाठी फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आला याची माहिती केंद्र सरकारने बंद लिफाफ्यात द्यावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. आता सरकार काय करणार आहे? राहुल गांधी हीच माहिती उघड करा अशी मागणी करीत आहेत. आता सुप्रीम कोर्टाने तीच माहिती बंद लिफाफ्यात मागितली आहे. अर्थात या ‘बंद लिफाफ्या’त येणारी माहिती आधीच बाहेर फुटली आहे. आधी ही माहिती फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी फोडली व खळबळ उडवून दिली आणि आता नवा खुलासा फ्रान्समधूनच झाला आहे. फ्रान्सची इन्व्हेस्टिगेटिव्ह वेबसाईट मीडिया पार्टने दावा केला आहे की, राफेल करारासाठी हिंदुस्थान सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीचे नाव प्रस्तावित केले होते. त्यामुळे दसॉल्ट एव्हिएशनकडे रिलायन्स डिफेन्सशी सामंजस्य करार करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नव्हता. कंपनीच्या अंतर्गत दस्तावेजात ही बाब स्पष्ट असल्याचेही ‘मीडिया पार्ट’ने म्हटले. त्यामुळे जे ओलांद म्हणाले तेच या नव्या खुलाशाने समोर आले. ओलांद खोटे बोलत आहेत असे सरकारचे समर्थक म्हणत होते. मग आता ‘मीडिया पार्ट’देखील खोटे बोलत आहे काय? मुळात त्यांना खोटे बोलण्याचे कारण काय? प्रश्न रिलायन्स डिफेन्सला राफेलचे कंत्राट मिळाले हा नसून विमाने काय किमतीला पडली हा आहे. राहुल गांधी यांनी अनेक माध्यमांतून राफेल व्यवहाराबाबत गौप्यस्फोट केला. याबाबत अनेक याचिका सुप्रीम कोर्टात आल्या.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

एसस जेनफोन मॅक्स M1आणि जेनफोन लाइट L1लॉन्च झाले, 1500 ...

national news
L1.यात जेनफोन मॅक्स M1प्रिमियम फोन आहे, ज्यामध्ये सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरशिवाय ...

25 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या सेकंद इंडिया मोबाइल ...

national news
25 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत सेकंद इंडिया मोबाइल काँग्रेस (आयएमसी) आयोजित करण्यात ...

रामाचा रावण झाला अभिनेत्याचा पंजाब रेल्वे अपघातात मृत्यू

national news
देशातील घडलेला आणि लोकांच्या निष्काळजीपणामुळे झालेला पंजाब येतील अपघात आहे. पंजाबच्या ...

राष्ट्रवादीचा हा माजी आमदार देतो गलीच्छ शिव्या क्लिप झाली ...

national news
आमदार असलेल्या सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक (आबा) ...

अवनि अर्थात टी १ वाघीणीचा कोर्टाने मागवला आहवाल, याचुकेवर ...

national news
नागपूर खंडपीठानं यवतमाळची नरभक्षक वाघीण टी-१ अर्थात अवनी हिला पकडण्यासाठी किंवा ...

रामाचा रावण झाला अभिनेत्याचा पंजाब रेल्वे अपघातात मृत्यू

national news
देशातील घडलेला आणि लोकांच्या निष्काळजीपणामुळे झालेला पंजाब येतील अपघात आहे. पंजाबच्या ...

राष्ट्रवादीचा हा माजी आमदार देतो गलीच्छ शिव्या क्लिप झाली ...

national news
आमदार असलेल्या सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक (आबा) ...

अवनि अर्थात टी १ वाघीणीचा कोर्टाने मागवला आहवाल, याचुकेवर ...

national news
नागपूर खंडपीठानं यवतमाळची नरभक्षक वाघीण टी-१ अर्थात अवनी हिला पकडण्यासाठी किंवा ...

त्यांना भान राहिले नाही, नवज्योत होत्या रुग्णालयात

national news
पंजाब येथे मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील जोडा बाजार येथील रावण दहन पाहणाऱ्या लोकांना ...

यवतमाळ १० करोडची रोकड जप्त

national news
महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील पिपरेवाडा टोल नाक्यावर 10 करोड रु ची रोकड जप्त करण्यात आली. ...