testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लोडशेडिंगविरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचे ‘कंदील’आंदोलन...

electricity
Last Modified शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (08:58 IST)
राष्ट्रवादीच्य़ा महिलांनी, युवक संघटनेने महावितरण कार्यालयासमोर केली निदर्शने...

इंधनाची दरवाढ, महागाईने पिचलेल्या जनतेवर, राज्यावर दुष्काळाचे संकट आले असतानाही भारनियमन लादणाऱ्या निष्क्रीय सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्यभरात आज तीव्र आंदोलन केले. 'अंधःकारात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' असे फलक दर्शवत महावितरणच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच तहसीलदार कार्यालयात भारनियमन रद्द करण्याबाबत निवेदनही देण्यात आले.
राज्यामध्ये दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत असतानाच आता वीजमहावितरण महामंडळाकडून लोडशेडिंग केले जात अाहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता पुरती बेजार झाली आहे. राज्यातील जनतेच्या समस्यांसाठी सरकारविरोधात आक्रमकपणे लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज ज्याठिकाणी लोडशेडिंग सुरु आहे त्याठिकाणी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ठिकठिकाणी युवक संघटनेच्यावतीने निदर्शने करुन निषेध करण्यात आला. शिवाय महावितरण विभागाला निवेदनही देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आज राज्यात ज्या ज्याठिकाणी लोडशेडिंग सुरु आहे त्या त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ
यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘कंदील’ आंदोलन करत सरकारला जागं करण्याचं काम केलं. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या गेटला कंदील अडकवून महिला आणि युवक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर युवक अध्यक्ष संग्राम कोते यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ठिकठिकाणी वीजमहावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिवाय आजपासून तीन दिवस युवक संघटनेच्यावतीने लोडशेडिंगविरोधात आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संग्राम कोते पाटील यांनी दिली.

औरंगाबाद, सिंदखेडा, धुळे ग्रामीण, राहुरी, शेवगाव, चिखली, हिंगोली, सेलू, मानवत, पाथरी, बारामती, इंदापूर, दौंड. मावळ, सातारा, उमरेड, अमरावती, अकोले तसेच चंद्रपूर या ठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

Redmi Go : महागड्या फोनचे फीचर्स सर्वात स्वस्त फोनमध्ये

national news
चिनी स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमीने भारतात आपला पहिला Android Go ब्रँडचा फोन लाँच केला. हे ...

काय राज ठाकरे पाकिस्तानी नायक बनू इच्छित आहे: विनोद तावडे

national news
भाजपच्या महाराष्ट्र इकाईचे नेते विनोद तावडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हल्ला ...

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपत

national news
राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पहिले अध्यक्ष रणजितसिंह मोहिते ...

‘मैं भी चौकीदार’या संकल्पनेला माझा पाठिंबा

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मैं भी चौकीदार’या संकल्पनेला माझा पाठिंबा ...

मुंबई विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल

national news
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाने २२, २३ व २४ एप्रिल २०१९ या पहिल्या ...