रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (12:28 IST)

'लग्नानंतर मुलीशी 5 मिनिटांपेक्षा जास्त फोनवर बोलू नका'

लग्नानंतर पती-पत्नी यांच्यात वाद- भांडणं होणे सामान्य गोष्ट आहे पण अनेकदा लहान-सहान वादानंतर काडीमोड देण्याची वेळ येते. अशात सिंधी पंचायतकडून सल्ला देण्यात आला आहे की मुलीच्या लग्नानंतर माहेरच्यांनी मुलींशी 5 मिनिटापेक्षा अधिक बोलू नये. 
 
मुलीच्या आयुष्यात हस्तक्षेप करू नये अशा सूचना सिंधी पंचायतीने दिल्या आहेत. त्यांच्याप्रमाणे मुलीशी फोनवर बोलायचं असेल, तिची विचारपूस करायची असेल तर पाच मिनिट पुरेसे आहे. तसेच नवविवाहित मुलींनी देखील सासरच्या लहान-सहान गोष्टी माहेरी सांगू नये. पंचायतीकडून लग्न झालेल्या मुलींना असा सल्ला देण्यात आला आहे.
 
सिंधी समाजात दर महिन्याला पती-पत्नीमध्ये वाद होण्याच्या 80 हून अधिक घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. या‍पैकी अनेक जोडप्यांच्या लग्नाला अजून दोन वर्षे झाली नसून सतत वाद होत असल्याचे समोर आले आहे. पंचायतीने तपासल्यावर माहेरच्या लोकांचा हस्तक्षेप हे वादाचं मूळ असल्याचं समोर आलं आहे. हीच बाब लक्षात घेता सिंधी समाजाकडून अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक स्तरावर 28 सिंधी पंचायती आणि सेंट्रल सिंधी पंचायतमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारींच्या प्रकरणांचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
पहिले प्रकरण 
बैरागढ येथे एका व्यक्तीने आपल्या मुलाचं लग्न मित्राच्या मुलीशी करून दिलं. लग्नानंतर मुलीची आई रोज मुलीला फोन करायची. मुलीच्या नवऱ्याला आणि सासुला फोनवर अशाप्रकारे खूप-खूप वेळ आणि सतत बोलणं पसंत नव्हतं. त्यानंतर सासऱ्यांनी मुलीला समजावलं पण यावरुन वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण थेट पंचायतमध्ये पोहचलं.
 
पंचायतने सुनेशी थेट बोलण्याऐवजी पत्नीच्या माध्यमातून बोलण्याचं सांगण्यात आलं. परिणामस्वरुप गैरसमज दूर होऊ लागले आणि आता कुटुंबात नवीन पाहुण्याच्या स्वागताची तयारी सुरु आहे.
 
दुसरे प्रकरण 
लग्नाच्या दोन महिन्यातच पती-पत्नीमध्ये भांडणं होऊ लागली. कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आला. मुलाच्या वडिलांनी पंचायतमध्ये याबाबत अपील केली. त्यानंतर कळून आले की मुलीला तिची लहान बहिणी फोनवर सासरच्या लोकांवर वर्चस्व मिळविण्याच्या युक्त्या सांगायची. पंचायतकडून पाच वेळा मुलीची काउंन्सलिंग करण्यात आली. मुलीच्या माहेरच्यांना कमीत कमी सहा महिने मुलीच्या संसारात लक्ष न घालण्याचा सल्ला दिला गेला त्यानंतर लग्न वाचू शकलं.
 
 
सेंट्रल सिंधी पंचायत समितीमध्ये 5 सदस्य 
कौटुंबिक वाद घालविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीत पाच सदस्य आहे. यात सीनिअर अॅडव्होकेट आणि मनौवैज्ञानिक काउंसर सामील आहे. समिती प्रकरण सामाजिक पातळीवर सोडवण्याच्या प्रयत्नात असते.
 
दाखल झालेल्या 95 टक्के प्रकरणांमध्ये असं समोर आलं की, माहेरच्यांच्या अधिक हस्तक्षेपामुळे मुलीला सासर्‍च्यांशी लवकर जुळवून घेता येत नाही. मुलाकडील तक्रार करतात की मुलगी सतत तिच्या माहेरच्यांशी फोनवर बोलण्यात व्यस्त असते आणि टोकल्यावर हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली जाते.