testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बँक कोणतीही लिंक पाठवत नाही, लिंक क्लिक करू नका नाहीतर होईल लुट

Last Modified मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (09:17 IST)
ऑनलाईन चोरीचे प्रकार फार वाढले आहे. पोलिसांनी सांगून सुद्धा अनेक लोक यास बळी पडत आहेत. नुकतेच येथील एका डॉक्टरला असा अनुभव आला आहे. त्यांना बँक कर्मचारी असल्याचे सांगत दक्षिण मुंबईतील एका डॉक्टरच्या अकाउंटमधून 3 लाख रुपये काढल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शनिवारी एका 28 वर्षीय तरुणाला पुण्यातून अटक केलीय. बिपिन महतो असे या संशयित आरोपीचे असून त्याने त्याने डॉक्टरला 3 लाखांचा चुना लावला होता.
एका इंग्रजी वृत्तपत्रात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी 21 नोव्हेंबर रोजी संबंधित डॉक्टरला एक फोन आला, समोरील व्यक्तीने डॉक्टरला तो बँक कर्मचारी असल्याचे सांगितले आणि बँकेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची विनंती केली. सोबतच
त्याने डॉक्टरला त्याची खासगी माहितीही त्यात भरण्यास सांगितले होते.मात्र त्यावेळी
डॉक्टरने साफ नकार दिला होता. मात्र समोरच्या व्यक्तीने डॉक्टरला फक्त तुमचा अकाउंट नंबर सांगा अशी विनंती केली. यामुळे डॉक्टरने त्याला अकाउंट नंबर दिला होता. या प्रकरणा नंतर डॉक्टरला मोबाईलवर मेसेज आला व त्यातील लिंकवर क्लिक करण्याच्या सूचना त्यात होत्या. त्यामुळे डॉक्टरने लगेचच त्यावर क्लिक केल होते आणि माहिती भरली मग काय पुढच्याच सेकंदाला त्याच्या खात्यातून 3 लाख रुपये काढले गेल्याचा मेसेज त्याला आला होता. यामुळे हादरलेल्या डॉक्टरने गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार केली. . पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने कोणाच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा झाली ते लगेच तपासले. आणि
त्यावेळी डॉक्टरच्या अकाउंटमध्ये. 2 लाख 90 हजार रुपये होते. पण लिंकवर क्लिक केल्यानंतर चार वेळा अकाउंटमधून पैसे काढण्यात आल्याचे दिसून आले होते. पहिल्यांदाच 1 लाख रुपये दोन वेळा त्यानंतर पन्नास हजार दोन वेळा, त्यानंतर चाळीस हजार रुपये काढण्यात आल्याचे समोर आले होते. आरोपीने हा सर्व प्रकार पुणे येथून केला असून त्याचे बँक अकाउंट देखील पुण्यातील असल्याचेही समोरआले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही तुमची माहिती देवू नका कारण कोणतीही बँक फोन करून माहिती गोळा करत नाही आणि कोणत्याही लिंक वर तर आजीबात क्लिक करू नका.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

LIC पॉलिसी असेल तर लवकर करा हे काम, नाही तर अडकू शकतो ...

national news
आपल्याकडे भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) पॉलिसी आहे आणि मॅच्योर होणार असेल तर लगेच आपलं ...

लंबोरगिनी हुराकेन ईवो लॉन्च, जाणून घ्या किंमत

national news
लंबोरगिनीने भारतात हुराकेन ईवो लॉन्च केली आहे. हे रेगुलर हुराकेनचा फेसलिफ्ट वर्जन आहे. हे ...

आणखी पाच महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा

national news
राज्यातील आणखी पाच महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा दिला आहे. यामुळे राज्यातील स्वायत्त ...

नाणार प्रकल्प आता अन्यत्र हलविण्यात येईल : मुख्यमंत्री

national news
कोकणातील नाणार येथील तेल शुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प अन्यत्र हलविण्याची औपचारिक घोषणा ...

ईडी चौकशीची भीती दाखवली म्हणून .....

national news
सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आगामी ...