शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (10:57 IST)

वडिलांचा हूबेहू पुतळा बघून नवरीला अश्रू अनावर

असं म्हणतात की वडील आणि मुलीचं नातं वेगळेच असते. आपल्या आयुष्यातून वडीलरुपी छत्र गमावल्यावर आपल्या लग्नात वडील नसल्याची खंत लेकीच्या मनात होती. अशा परिस्थितीत भावाने आणि आईने आपल्या बहिणीला आणि मुलीला अशी भेट द्यावी जी तिच्या सोबती नेहमीसाठी असेल. आणि त्यांनी जी भेट दिली ती बघून तिला अश्रू अनावर झाले. तिला भावुक झालेलं पाहून लग्न मंडपात सर्वांचे डोळे पाणावले. सोशल मीडियावर लग्नाचे बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. काही मनाला भावुक करणारे असतात. संशय सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो मनाला भावुक करणारा आहे. या व्हिडीओ मध्ये एका लेकीला आपल्या लग्नाच्या वेळी दिवंगत वडिलांचा मेणाचा हूबेहू पुतळा पाहून अश्रू अनावर झाले. तिची ही अवस्था व्हिडीओ मध्ये टिपली आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by