1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (14:02 IST)

बाईकवर बसून फिल्मी स्टाईलमध्ये कपलने केले प्री-वेडिंग शूट!

pre-wedding shoot in a filmy style
प्री-वेडिंग शूट ही आजकाल फॅशन झाली आहे. लग्नापूर्वी जोडपे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्री-वेडिंग शूट करतात. प्री-वेडिंगचे मीम्स आणि व्हिडिओही अनेकदा इंटरनेटवर शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल फिल्मी स्टाईलमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे बाईकवर बसले आहे. यानंतर, बाइक सुरू केली जाते आणि क्रेनच्या मदतीने बाइकला कारच्या वरून हवेत उचलते आणि बाइक दुसऱ्या बाजूला घेऊन जातो. हे प्री-वेडिंग शूट एखाद्या फिल्म शूटपेक्षा कमी नाही. ज्या दरम्यान हा व्हिडीओ शूट केला जात होता, त्यावेळी आजूबाजूला लोकही जमा झाले होते. गाडीच्या वरून बाईक काढताच लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
 
हा व्हिडिओ @@bestofallll या यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आठ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओला 15,000 लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओला मजेदार म्हटले आहे, तर अनेक लोक इतर अनेक प्रकारे कमेंट करत आहेत.
Edited By - Priya Dixit