गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

मुंग्यांचे डोळे निश्चित करतात शिकारीची वेळ

मुंग्यांमध्ये पाहण्याची अद्‌भुत क्षमता असते. मुंग्यांचे दृश्य संवेदी गुणधर्म जाणून घेण्यासाठी एका ताज्या अध्ययनात त्यांच्या संयुक्त डोळ्यांच्या संरचनात्मक वैशिष्ट्यांचा शोध घेण्यात आला. मुंग्यांच्या डोळ्यांच्या क्षमतेवर शिकार करण्याची वेळ अवलंबून असते, असे दिसून आले.
 
केरळच्या बर्चमेंस कॉलेजच्या प्राणिशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी मुग्यांच्या डाईएकेा रुगोस व ओडोंटोमेकस हिमेटोडस या दोन प्रजातींच्या संयुक्त डोळ्यांचे सविस्तर अध्ययन केले. त्यात या दोन प्रजातींद्वारे अवलंबल्या जाणार्‍या प्रकाश संवेदी रणनीतींमध्ये मोठा फरक दिसून आला.
 
या दोन्ही प्रजातींच्या डोक्याचा आकार, डोळ्यांचा व्यास, संयुक्त डोळ्याच्या पृष्ठभागावर आढळणार्‍या नेत्रांशकांची लांबी, मज्जातंतूशी संबंधित रेबडामची लांबी व मेंदूच्या आधारिय लेमिनाच्या रुंदीचे आकलन केले. या अध्ययनाचे प्रमुख डॉ. मार्टिन जे. बाबू यांनी सांगितले की, प्रत्येक संयुक्त नेत्राच्या पृष्ठभागावर हजारो षटकोनीय संरचना आढळून येतात, त्यांना नेत्रांशक म्हणतात.
 
संयुक्त नेत्राच्या प्रत्येक नेत्रिकेमध्ये वेगवेगळे प्रतिबिंब बनविण्याची क्षमता असते. अशा प्रकारच्या दृष्टीला मोजेक दृष्टी म्हणतात. त्यात बनलेले प्रतिबिंब अधिक स्पष्ट व विस्तृत असते. या दोन्ही प्रजातीच्या मुंग्यांची पाहण्याची क्षमता अतिशय जास्त असते.
 
प्रकाशाची गुणवत्ता दिवसभर बदलत असते व रात्री तो अतिशय कमी होतो. त्याचा प्रभाव मुंग्यांच्या दृश्य संवेदी हालचालींवर पडतो, पण त्या पर्यावरण व प्रकाशातील बदलांसोबत जुळवून घेतात.