1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. ट्रेडिंग
Written By
Last Updated : सोमवार, 16 डिसेंबर 2024 (15:03 IST)

चॉकलेट आणि चिकन टिक्का ची फ्युजन मिठाईचा व्हिडीओ व्हायरल

Photo- Instagram
सध्या सोशल मीडियावर एक आगळावेगळा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये चिकन टिक्का आणि चॉकलेटची फ्युजन मिठाई बनवली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल  मीडियाच्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. 

या व्हिडीओ मध्ये चिकन टिक्का चॉकलेट मध्ये मिसळून एक फ्युजन मिठाई तयार केल्याचे दाखवले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारोवेळा पहिला गेला आहे. 

व्हिडीओ मध्ये पांढरे चॉकलेट एका साच्यात ओतले जाते आहे. नंतर त्यात चिकन टिक्का भरला जातो नंतर चॉकलेटच्या दुसऱ्या लेअर ने हे बंद केले जाते आणि या मिश्रणाला काही तासांसाठी फ्रिज केले जाते. हे एक फ्युजन गोड आहे.याला दुबईचे चॉकलेट चिकन टिक्का मसाला हे कॅप्शन देत शेअर केले आहे.  
 
या व्हिडिओवर नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. 
Edited By - Priya Dixit