1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

काय म्हणता कफ सिरपचा सर्वाधिक वापर नशेसाठी

What to say Most use of cough syrup for intoxication
मुंबईत कफ सिरपचा सर्वाधिक वापर नशेसाठी होत असल्याने त्यांची विक्री वाढली आहे. मुंबई पोलिसांनी वर्षभरात सुमारे 7 हजार कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या  आहेत.
 
मुंबईमध्ये स्थानिक पोलिस ठाणे, तसेच अंमली पदार्थविरोधी पथकांनी असे पदार्थ पुरविणाऱ्यांविरोधात कंबर कसली आहे. त्यामुळे ते सहज मिळणे कठीण झाले आहे. यामुळे नशेबाजांनी प्रतिबंधित औषधांचा डोस घेण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. केमिस्टमध्ये कफ सिरप हे प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्वाधिक विक्री होणारे औषध आहे.
 
नशेसाठी कफ सिरपची विक्री करणाऱ्यांवर पोलिस आणि एफडीएकडून कारवाई करण्यात येते.एफडीएने 2019 मध्ये अशा केवळ दोन-तीन कारवाई केल्या आहेत मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मात्र 2019 मध्ये 7 हजार कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तर 11 जणांना अटक केली आहे.