1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2024 (22:27 IST)

मुंबईतून व्हॅन मध्ये 4 कोटी 70 लाखांची रोकड आढळली

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना पवई परिसरात एका व्हॅन मधून तब्बल 4 कोटी 70 लाखांची रोख रक्कम सापडली असून याची माहिती निवडणूक कार्यालय आणि आयकर विभागाला देण्यात आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, 6 मे रोजी पवई पोलीस ठाण्याच्या आवारात गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी केली होती. या नाकेबंदीत कॅश व्हॅन जात असताना पवई पोलिसांनी गाडीला थमबवून चौकशी केली त्यात व्हॅन मधून तब्बल 4 कोटी 70 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. 

याची माहिती पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात दिली .निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या रकमेचा बारकोड स्कॅन केल्यावर त्यांना बारकोड मिसमॅच असलेला आढळला. या बाबतीत आयकर विभागाने व्हॅन ताब्यात घेत हा पैसा कुठून आणला आणि कुठे घेऊन जात होते. या पैशाचा वापर एटीएम मशीन मध्ये टाकण्यासाठी घेऊन जात होते की लोकसभा निवडणुकीसाठी या संदर्भात आयकर विभाग पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit