1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2024
  3. लोकसभा निवडणूक 2024 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जून 2024 (12:49 IST)

सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर परिणाम आधीच पोस्टर मंत्रालयसमोर

sunetra pawar
पवार कुटुंब लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये नेहमीच राहिले आहे. पण आता पवार कुटुंबातील नणंद-भावजई म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या एकमेकांविरुद्ध उभ्या आहे, आता सर्वांना कुतूहल आहे की, बारामतीत कोणाचे वर्चस्व असणार. जरी या नणंद-भावजई परस्पर उभ्या असल्या तरी खरा सामना हा शरद पवार आणि अजित पवार यांमध्ये असणार आहे. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे भावनिक आव्हान करीत आहे तर दुरीकडे अजित पवारांनी दाखवलेल्या विकासाचा मुद्दा तर मतदार यांमधील काय निवडतील कोणाच्या मागे उभे राहतील ते आज कळून येणार आहे. तर सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी असून परिणाम आधीच त्याच्या यशाचे बॅनर लावण्यात आले आहे. 
 
Sunetra
सुनेत्रा पवार यांच्या यशाचे बॅनर हे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहे. तसेच या बॅनरवर बारामतीतील नागरिकांचे आणि मतदातांचे आभार मानले आहे. तसेच महत्वाची बातमी 
म्हणजे मंत्रालयासमोर हे बॅनर लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयाची बॅनरबाजी परिणाम पूर्वीच दिसल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.