बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2024 (23:03 IST)

भाजप 200 पण पार करणार नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

Aditya Thackeray
भाजप जरी अबकी बार 400 पार म्हणत असली तरीही भाजप यंदाच्या निवडणुकीत 400 काय तर 200 देखील पार करणार नाही. भाजपला, गद्दारांना, महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मतदाता कधीही मतदान करणार नाही.असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. 
 
मावळ लोकसभा मतदार संघासाठी उबाठा आणि महाविकास आघाडीचे आकुर्डीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यावेळी पदयात्रा काढण्यात आली. त्यात आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनतेची आणि कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्ष आहे. आता देशात परिवर्तन होणार असून आता भाजपचे सरकार परत येणार नाही.यंदा अबकी बार भाजप तडीपार करण्याची गरज आहे.   

भाजप मुळे युवकांचे रोजगार हिरावले, नोकरीची संधी आली नाही. आमचा गुजरातला विरोध नाही. पण महाराष्ट्र, आसाम, केरळ आणि मणिपूरला त्यांचे हक्काचे मिळालेच पाहिजे. या सरकार मध्ये गुंड रील काढतात. बलात्कार करण्याला फाशी झालीच पाहिजे. पण भाजपकडून बलात्काऱ्यांना वाचविण्याचे काम केले जाते. महागाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. उद्धव ठाकरे सरकार ने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र भाजप शेतकऱ्यांवर  
लाठ्या-काठ्या चालविल्या, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
 
 
Edited By- Priya Dixit