1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2024 (09:54 IST)

प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता?

prakash ambedkar
राज्याच्या राजकारणात मोठा ट्विट्स येण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीची स्थापना होऊ शकलेली नाही. मात्र मविआचा भाग नसला तरी काँग्रेस वंचितला अकोल्यात पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
 
प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या जागेवरून काँग्रेस आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्याबाबत पडद्यामागे हालचाली होत आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत यावर चर्चा केली जात आहे.  
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला अकोल्यात पाठिंबा देऊ शकते. या जागेवर वंचितकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे  या जागेवर आंबेडकरांना पाठिंबा देण्याचा विचार काँग्रेसकडून केला जातोय. वंचितला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. मात्र तरीदेखील प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला कोणत्याही 7 जागांवर पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली आहे.
 
त्यामुळेच आता काँग्रेसदेखील आंबेडकरांना अकोल्यातून पाठिंबा देण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात आम्ही तुम्हाला कोणत्याही सात जागांवर पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं.
 
त्यानंतर आंबेडकरांनी नागपूर आणि कोल्हापूर या दोन जागांसाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहीर केला होता. आणखी कोणत्या पाच जागांवर आम्ही पाठिंबा द्यावा हे काँग्रेसने सांगावे असे आंबेडकर म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उर्वरित पाच जागांची यादी प्रकाश आंबेडकरांना देण्याची शक्यता आहे.
 
या सात जागांच्या बदल्यात काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी तशी मागणी काँग्रेसच्या हायकमांकडे केली आहे. तशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. हायकमांडने ही मागणी केल्यास काँग्रेस अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना बळ पुरवू शकते.

Edited by -Ratnadeep Ranshoor