गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2024 (18:40 IST)

लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभेसाठी 10 जागा का? जाणून घ्या शरद पवार यांचा नवीन प्लॅन

sharad panwar
माविआ कडून काही दिवसांपूर्वी जागा वाटपाची घोषणा करण्यात आली असून या मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 21 जागा, काँग्रेस पक्षाला 17 जागा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला फक्त 10 जागा मिळाल्या असून ते  10 लोकसभा मतदार संघात उमेदवार उभे करणार आहे. शरदचंद्र पवार गटाला फक्त 10 जागा का मिळाल्या या वर माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी आपला मास्टर प्लॅन सांगितला.

ते म्हणाले आम्ही लोकसभे साठी फक्त 10 जागांवर उमेदवार दिले कारण साल 2019 मध्ये आमच्या कडे चार खासदार होते. परंतु आमचे लक्ष लोकसभा नसून विधानसभा आहे. लोकसभेसाठी कमी जागा घेऊन आमचा प्रयत्न विधानसभेला अधिक जागा घेण्याचा आहे. 
 
आमचा विधानसभा निवडणुकीत माविआच्या मार्फत जास्त उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न आहे. या मुळे आम्ही लोकसभेत कमी जागा घेतली. यंदा लोकसभा निवडणुकीत 50 टक्के पेक्षा जास्त जागांवर माविआचे उमेदवार विजयी होतील असा आमचा विश्वास आहे. 
 
Edited By- Priya Dixit