मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2024 (18:00 IST)

लोकसभा निवडणूक 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदीची नंदुरबार मध्ये मोठी सभा, विरोधकांवर निशाणा साधला म्हणाले हा फक्त ट्रेलर आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील नंदुरबार येथे सत्ताधारी महायुती आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ सभा घेतली आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेतला 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज 10 मे रोजी नंदुरबार येथे जाहीर सभा होती.या वेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद  पवार,आणि उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.ते म्हणाले “वंचित आणि आदिवासींची सेवा म्हणजे माझ्यासाठी कुटुंबातील सदस्याची सेवा करण्यासारखे आहे. मी कोणत्या मोठ्या राजघराण्यातून आलेलो नाही मी गरिबीत वाढलेला माणूस आहे. अनेक आदिवासी कुटुंबांकडे कायमस्वरूपी घरे नव्हती. स्वातंत्र्याच्या 60 वर्षांनंतरही खेड्यापाड्यात वीज पोहोचलेली नव्हती . 

“मोदींनी प्रतिज्ञा घेतली होती – प्रत्येक गरीब, प्रत्येक आदिवासीला घर, प्रत्येक आदिवासीच्या घरात पाणी, प्रत्येक कुटुंबाला पाणी, प्रत्येक गावात वीज. आम्ही नंदुरबारमधील सुमारे 1.25 लाख गरीब लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कायमस्वरूपी घरे दिली. गेल्या 10 वर्षात आम्ही 4 कोटी पक्की घरे दिली.
 
एनडीए सरकारने महाराष्ट्रातील 20 हजारांहून अधिक गावांमध्ये प्रत्येक घरात पाणी पोहोचवले आहे. यामध्ये नंदुरबारमधील 111 गावांचाही समावेश आहे. सध्या हा ट्रेलर आहे, मोदींना अजून खूप काही करायचे आहे.
काँग्रेसने आदिवासी बांधवांची कधीच पर्वा केली नाही. एकही गरीब कुपोषणाला बळी पडू नये याची आम्हाला काळजी होती. आज नंदुरबारमधील12 लाखांहून अधिक लोकांना मोफत रेशन मिळत आहे.
 
विरोधकांवर ताशेरे ओढत पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसला माहीत आहे की, विकासात मोदींशी स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत खोट्याचा कारखाना उघडला असून खोटेपणा पसरवत आहे. कधी ते आरक्षणाबद्दल खोटे बोलतात तर कधी संविधानाबद्दल खोटे बोलतात.“ही महाआघाडी आरक्षणाच्या नरसंहाराची मोठी मोहीम राबवत आहे.
 
सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, “काँग्रेसच्या राजपुत्राचे गुरू अमेरिकेत राहतात, त्यांनी भारतातील लोकांविरुद्ध वर्णद्वेषी वक्तव्य केले आहे.काँग्रेसचा अजेंडा किती घातक आहे हेही प्रिन्सच्या गुरूंनी उघड केले आहे. 

शरद पवार यांचावर टीका करताना ते म्हणाले महाराष्ट्रातील एका दिग्गज नेत्याने बारामती निवडणुकीनंतर वक्तव्य केले आहे. ते इतके हताश आणि निराश झाले आहेत की 4 जूननंतर राजकीय जीवनात टिकायचे असेल तर छोट्या राजकीय पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे त्यांना वाटते. म्हणून  बनावट राष्ट्रवादी आणि बनावट शिवसेनेने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे ठरवले आहे. 

Edited By- Priya Dixit