शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वेबदुनिया|

अलिबागमध्‍ये मतदार हेल्‍पलाईन सुविधा

निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार रायगड लोकसभा मतदार संघातील १९२-अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयी मतदार माहिती केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उपविभागीय अधिकारी, अलिबाग तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतदारांना मतदार याद्या व इतर बाबींची वस्तूनिष्ठ माहिती मतदार माहिती केंद्राच्या माध्यमातून (VOTER HELPLINE) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतदारांना दूरध्वनी क्रमांक 02141- 226669 या क्रमांकावर दूरध्वनी करुन मतदार यादीतील त्यांचा तपशील जाणून घेता येणार आहे.