testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अनंत गितेंना कमी महत्त्वाचे खाते; शिवसेना नाराज?

shivsena
नवी दिल्ली| wd| Last Modified मंगळवार, 27 मे 2014 (16:00 IST)
शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना अवजड उद्योग मं‍त्रालय दिले आहे. त्यामुळे केंद्रात कमी महत्त्वाचे खाते मिळाल्याने शिवसेना नाराज झाल्याचे समजते. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गिते यांनी मंगळवारी चर्चा केल्याचेही समजते. शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला. परंतु त्या तुलनेत मोदींच्या मंत्रिमंडळात कमी महत्त्वाचे खाते मिळाल्याने शिवसेनात नाराजी पसरली आहे.

नरेंद्र मोदी यांच्यासोबत गिते यांनी सोमवारी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. तरी देखील गितेंनी अजूनपर्यंत अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारलेला नाही. मात्र उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर गिते आपल्या पदाचा पदभार स्विकारणार असल्याचे समजते.



मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला फक्त एकच कॅबिनेट अवजड उद्योग मंत्रालय दिले आहे. या तुलनेने
लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामविलास पासवान यांना चांगले खाते दिल्याचे दबक्या आवाजात चर्चा आहे. दरम्यान, यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिल्याने शिवसेना नाराज झाली होती. शिवसेना नेत्यांनी नवाझ शरीफ यांच्या भारतात येण्यावर विरोध केला होता. परंतु मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेचा विरोध मावळला होता. आता मात्र शिवसेनेला केंद्रात एकमात्र मंत्रीपद दिल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

क्रिकेटच्या सामन्यामुळे सानिया मिर्झा अचानकपणे ट्विटरवरून ...

national news
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये आज क्रिकेटचा सामना रंगणार आहे. त्यामुळे ...

Facebook वर या चुकांमुळे आपण होऊ शकता ब्लॉक

national news
दुनियेत फेसबुक सर्वात अधिक वापरण्यात येणारा सोशल मीडिया मीडियम आहे. पर्सनल ...

लेस्बियन पत्नी विरुद्ध पतीची पोलीसात तक्रार

national news
उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये एका पतीने पत्नीविरोधात ती लेस्बियन असल्याची तक्रार पोलीस ...

गडकरी शब्द पाळतात, गंगा नदी स्वच्छ होणार : आनंद महिंद्रा

national news
गंगा नदी मार्च २०२० पर्यंत पुर्णपणे स्वच्छ केली जाईल असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ...

नवज्योतसिंग सिध्दू पाकिस्तानचे एजंट

national news
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार्‍या नवज्योतसिंग ...