testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

इंग्रजांप्रमाणे भाजपलाही घालवू- राहुल गांधी

औरंगाबाद| वेबदुनिया| Last Modified गुरूवार, 6 मार्च 2014 (10:25 IST)

कॉंग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून एक विचारप्रवाह असल्याचा भारतीय जनता पक्षाला (भाजप) विसर पडला आहे. हिंदूस्तानातून कॉंग्रेसला संपविण्याची भाषा करणार्‍या भाजपने पुन्हा भारताचा इतिहास वाचावा. त्यांचा इतिहास कच्चा दिसतोय, अशा शब्दांत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली. कॉंग्रेसने इंग्रजांना प्रेमाने घालवले होते. त्याप्रमाणे भाजपलाही घालवू असेही राहु यांनी औरंगाबादेतील जाहीर सभेत सांगितले.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांची ही पहिलीच सभा ठरली आहे. राहुल गांधी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर आले आहेत. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर बुधवार दुपारी आयोजित केलेल्या जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले.

राहुल गांधी म्हणाले,
कॉंग्रेसचा हा विचार राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. कुराण, गीता या धर्मग्रंथांमध्येही हेच सांगण्यात आले आहे. गुरुनानक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही हिंदूस्तानाला एकात्मतेची शिकवण दिली आहे.
भाजप नेत्यांनी गीता वाचलीच नसल्याचे सांगून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

राहुल यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. सभेचे विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर या दोघांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते.


यावर अधिक वाचा :