testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मोदींच्या बालेकिल्ल्यात केजरीवालांचा 'रोड शो'; दिल्लीत 'आप'चा राडा

अहमदाबाद/दिल्ली| wd| Last Modified गुरूवार, 6 मार्च 2014 (11:42 IST)
आम आदमी पक्षाचा (आप)'रोड शो'गुजरात पोलिसांनी रोखून यांना ताब्यात घेतल्याने तीव्र पडसाद दिल्लीत उमटले. आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयावर हल्लाबोल केला.
भाजप कार्यकर्त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडफेक केली.त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या गुजरातमध्ये आपच्या 'रोड शो'ला परवानगी नसल्याचे कारण दाखवत केजरीवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना गुजरात पोलिसांनी अटक केल्यामुळे 'आप'च्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. केजरीवाल यांच्या अटकेचे तीव्र पडसाद दिल्लीत तत्काळ उमटले. 'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या मुख्यालयावर निषेध मोर्चा काढला. नरेंद्र मोदींच्या विरोधात निदर्शने केली. यादरम्यान, भाजप आणि 'आप'च्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेकही केली.
यावेळी 'आप'चे नेते आशुतोष आणि शाजिया इल्‍मी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. निदर्शनादरम्यान 'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात बेकायदा प्रवेशही करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर 'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात तोडफोड केली. याशिवाय भाजप कार्यालयावर दगडफेकही केली.
महाराष्ट्रात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हेदेखील दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. तेथेही त्यांच्या जाहीर सभा झाल्या. मात्र, त्यांची सभा रोखण्याची कोणाची हिम्मत झाली नाही. गुजरातमध्ये केजरीवाल यांचा रोड शो का रोखण्यात आला? केजरीवाल यांचा रोड शो पूर्वनियोजित होता. त्यामुळे केजरीवाल यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घ्यायला नको होते, असे
आपच्या नेत्या शाजिया इल्मी यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

इंडिका, इंडिगो चे उत्पादन बंद

national news
टाटा मोटार्सने इंडिका व इंडिगो या लोकप्रिय गाड्यांचे उत्पादन एप्रिलपासून बंद केले आहे. ...

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच, ४ ठार

national news
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तानने ...

नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी 'या' बंगल्यात राहणार नाही

national news
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांसाठी बांधण्यात आलेल्या ...

खासदार बंडारू दत्तात्रय यांच्या मुलाचे निधन

national news
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार बंडारू दत्तात्रय यांच्या मुलगा बंडारू वैष्णव (२१) ...

देशात 17 राज्यांमध्ये तापमान 40 डिग्रीहून अधिक, बूंदी ...

national news
देशात उष्णतेमुळे तापत आहे. उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट असल्याने लोकांची हाल होत ...

Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

national news
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...

एअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक

national news
एअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...

डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवेची शक्यता

national news
येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न करणार असून डिसेंबर 2019 ...