testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राज ठाकरेंची तिसरी आघाडी

मुंबई| WD| Last Modified शुक्रवार, 7 मार्च 2014 (11:34 IST)
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे हे अचानक राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या दादरच्या निवासस्थानी दाखल झाल्यामुळे राजकीय वतरुळात एकच खळबळ उडाली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत मनसेच्या मदतीने अपक्ष व लहान पक्षांचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा या नेत्यांचा प्रयत्न असून महाराष्ट्राच्या राजकारणात येणार्‍या
काळात प्रभावी तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कोरे व पाटील यांनी स्पष्ट केले.

मात्र त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का?, राज ठाकरेंच्या मनात नेमके चाललेय तरी काय? ते आपले शिलेदार लोकसभेच्या ङ्कैदानात उतरवणार का? नितीन गडकरींच्या ऑफरचे काय करणार?, इंजिन कुठे-कुठे धावणार? याबाबत आधीच संभ्रमात असलेले मनसैनिक अधिकच गोंधळात पडलेत. कारण, महायुतीची दारे बंद झाल्यानंतर ‘राजसाहेब’ आता तिसर्‍या आघाडीचा पर्यायही अजमावून पाहात असल्याचे संकेत मिळाले आहेत.
जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, शेकापचे नेते जयंत पाटील आणि नाशिकचे शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. हे त्रिकूट एकत्र ‘कृष्णकुंज’वर आल्याचे पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. छोटय़ा-छोटय़ा पक्षांना सोबत घेऊन तिसर्‍या आघाडीची मोट बांधण्याचा विचार राज यांच्या डोक्यात घोळतोय की काय, अशी शंका राजकीय जाणकारांना आली. या शक्यतेवर विनय कोरे यांनी बैठकीनंतर शिक्कामोर्तब केले. कोरे व पाटील यांनी असे संकेत दिले की विधानसभेमधून विधानपरिषदेत निवडून देण्याच्या नऊ जागांच्या निवडणुका आता बिनविरोध होणार नाहीत. एक दहावा उमेदवार आता रिंगणात उतरणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि महायुती वगळता महाराष्ट्रातील अन्य पक्ष एकत्र येऊन तिसर्‍या आघाडीसारखा प्रयोग करता येऊ शकतो का, याचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे विनय कोरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. अर्थात, या बैठकीत या संदर्भात अगदीच प्राथमिक चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तिसरी आघाडी स्थापन झाल्यास त्यात छोटे पक्ष नक्कीच सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोरे आणि जयंत पाटील यांच्या डोक्यात हे समीकरण जवळपास पक्के असल्याचे दिसते. ते राज यांना कितपत पटते आणि राज्यातील जनतेला खरोखरच तिसरा पर्याय मिळतो का, हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, येत्या 9 तारखेला होणार्‍या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात, नितीन गडकरींच्या ऑफरबद्दल काही खुलासा करतात का, शिवसेनेने केलेल्या टिप्पणीला प्रत्युत्तर देतात का, याबद्दल मनसैनिकांमध्ये उत्सुकता आहे. तेव्हाच ते तिसर्‍या आघाडीबाबतही आपली भूमिका स्पष्ट करू शकतात. त्यामुळे राज यांचे मेळाव्यातील भाषण अनेक प्रश्नांची उत्तरे देणारेच ठरणार आहे.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

रिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा

national news
पेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...

वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 वर प्रदर्शन भरवत ...

national news
वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर

national news
BSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...

गुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध

national news
'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...