मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह कोटेशन
Written By वेबदुनिया|

बेडवर प्रणयापेक्षा अधिक होतात भांडणं!

नवविवाहितांची नव्याची नवलाई संपली की संसाराच्या गोष्टी सुरू होतात आणि त्याचे प्रतिबिंब बेडरूममध्येही पडू लागले. आता याच विषयावर ब्रिटनमध्ये एख पाहणी करण्यात आली. त्यात असे दिसून आले की, दहा वर्षांच्या काळात बेडवर जितक्या वेळा दांपत्याचा प्रणय रंगतो त्यापेक्षाही अधिक वेळा त्यांच्यामध्ये घरगुती कारणांवरून भांडणे होतात! 

ब्रिटनमधील या पाहणीनुसार एखादे जोडपे दहा वर्षांमध्ये सुमारे 480 वेळा शय्यासुख घेते तर त्याच शय्येवर 720 वेळा भांडते! यापेक्षाही अधिक धक्कादायक माहिती तेथील पाहणीतून समोर आली आहे. ब्रिटिश लोक दहा वर्षांच्या काळात सुमारे दोन वर्षे आठ महिनेत एकत्र झोपतात. बिछान्यात ते सुमारे 3640 वेळा आलिंगन देतात.

तसेच बेडवरच सुमारे 120वेळा नाश्ता घेतात. पुस्तक वाचण्याच्या बाबतीत हा आकडा 240 असा आहे. बिछान्यात बसून ते दहा वर्षांच्या काळात 3650 वेळा ट्विट करू शकतात तर मोबाईलवरून 14,600 वेळा मेसेज पाठवतात. बिछान्यातूनच ते दहा वर्षांच्य काळात सुमारे 38 तास 50 मिनिटे मोबाईलवर बोलण्यात घालवतात.