testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नटसम्राटचा बनवणार ‘प्रिक्वेल’

nanapatekar
Last Modified शनिवार, 5 डिसेंबर 2015 (15:17 IST)
नाना पाटेकर यांचा जबरदस्त अभिनय असलेला आणि महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘नटसम्राट’ हा चित्रपट तात्यासाहेब शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ ह्या अजरामर नाटकावर आधारित असून या चित्रपटात नाना पाटेकर आप्पासाहेब बेलवलकर ह्या नटसम्राटाच्या भूमिकेत आपल्याला चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाविषयी सध्या उत्सुकता ताणली गेली असतानाच, चित्रपटाच्या नव्या ट्रेलर लाँच वेळी नानांनीच आता ह्या चित्रपटाचा पूर्वभाग म्हणजेच प्रिक्वेल बनणार असल्याची घोषणा केली.
नाना पाटेकरांनी ट्रेलर लाँचवेळी महेश मांजरेकरांच्या मनातील ही गोष्ट जाहीर केली. आप्पासाहेब बेलवलकरांचा नटसम्राट होण्याचा काळ यात दाखवण्यात येईल. दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी याविषयी बोलताना सांगितले, नानांसोबत एक फिल्म केल्यावर आता अजून एक फिल्म करना तो बनता है, मनात नटसम्राटचा प्रिक्वेल बनवण्याचा विचार आला, तो मी नानाला बोलून दाखवला. पण कथा कशी असेल, ते अद्याप कागदावर उतरवले नाही. नटसम्राट चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मगच दुसर्‍या चित्रपटावर काम सुरू करू. नटसम्राटाच्या यशस्वी कारकिर्दीवर, तो नटसम्राट कसा झाला, ह्यावर कदाचित चित्रपटाचा विषय असू शकेल. आता सध्या डोक्यात ह्या कथेविषयीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. कथेत नाना असेल हे नक्की. बाकी आताच्या चित्रपटातील पात्रांपैकी कोण असेल आणि कोण नसेल ते काही आताच सांगता येणार नाही. पण येत्या वर्षात त्या दिशेने पावलं उचलायचा विचार सध्या मनात आहे.


यावर अधिक वाचा :

काजल ने घेतले पत्रकारितेचे प्रशिक्षण

national news
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका मिळवली आणि ...

रणकपूरचे जैन मंदिर

national news
अजोड स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी राजस्थान प्रसिद्ध आहे. याच राजस्थानात अरवली पर्वतरांगाजवळ ...

प्रियंकाने मागितले 14 कोटी मानधन !

national news
सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्राची ओळख बनली आहे. विविध ...

प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या 'प्रेमवारी'चा मुहूर्त संपन्न

national news
'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं', प्रेमाची हि कधीच न बदलणारी संकल्पना एका ...

'3 इडियट्स' चा सीक्वल येणार

national news
आता लवकरच 3 इडिएट्सचा सीक्वल येत आहे. 2009 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमाचं दिग्दर्शन ...