शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018 (13:02 IST)

आम्ही दोघी : तीन वाटांवरचे चित्रपट

marathi movie aamhi doghi
'आम्ही दोघी' हा महिलाप्रधान चित्रपट आहे. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीकेंद्रित चित्रपटांनी चांगली कामगिरी केली आहे. अशा चित्रपटांना चांगलाप्रतिसादही मिळतो. याच पार्श्वभूमीवर मराठीतही असे प्रयोग केले जात आहेत. प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे या मराठीतल्या दोन सशक्त अभिनेत्री या निमित्ताने एकत्र येत आहेत. मुक्ता यात वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे तर प्रियाचा लूकही लक्ष वेधून घेत आहे. 'आम्ही दोघी' हा मानवी नातेसंबंधांवर आधारित चित्रपट आहे. प्रतिमा जोशी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 
 
प्रिया आणि मुक्तासोबत भूषण प्रधान, किरण करमरकर, आरती वडकबाळकर, प्रसाद बर्वे असे कलाकार चित्रपटात आहेत. या चित्रपटातून नात्याला वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आईविना वाढलेली 16 वर्षांची सावी आणि 25 वर्षांची अम्मी यांच्यातले नातेसंबंध चित्रपटातून उलगडत जातात. या दोघीही समांतर आयुष्य जगत असतात. पण त्या दोघी जवळ येतात. त्यांच्यात वेगळं नातं खुलत जातं, अशी चित्रपटाची कथा आहे. 
मुक्ता आणि प्रिया यांना एकत्र बघणं प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. शरद केळकर आणि सई ताम्हणकर ही जोडी 'राक्षस'मधून रसिकांसमोर येत आहे. 'राक्षस' हा थरारपट आहे. ग्लॅमरस व्यक्तिरेखा साकारणारी सई ताम्हणकर यात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ध्यानेश झोटिंगने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचा विषयवेगळा आहे. माहितीपटांचा एक निर्माता हरवतो. त्याला शोधण्यासाठी त्याची मुलगी प्रयत्नशील आहे. या प्रवासात घडणार्‍या थरारक घटना चित्रपटात पाहता येतील. 'अ‍ॅट्रॉसिटी' हा चित्रपटही रसिकांचा कौल अजमावत आहे. दीपक कदम यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
 
आरती देशपांडे