शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By वेबदुनिया|

अक्षयचा ७२ मैल- एक प्रवास जुलै मध्ये

PR
अक्षय कुमारच्या ग्रेझींग गोट पिक्चर्स संस्थेची निर्मिती असलेला ७२ मैल- एक प्रवास हा मराठी चित्रपट येत्या २६ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. ग्रामीण भारताच्या पार्श्वभूमीवर १३ वर्षीय अशोकचा स्वत:तील सर्वोच्च क्षमता, प्रतिभा शोधण्याचा प्रेरणादायी प्रवास यामध्ये चितारण्यात आला आहे. या प्रवासात जुळलेल्या नातेसंबंधांचाही धांडोळा यामध्ये मांडण्यात आला आहे.

चित्रपटाचा कालखंड स्वातंत्र्यानंतरचा आहे म्हणजेच हा पिरिएड सिनेमा आहे. चित्रपट अशोक वाटकर यांच्या आत्मचरित्रावर आधारलेला असून राधाक्काचा अशोकच्या जडणघडणीतील प्रभाव रेखाटतो.

अक्षय कुमार प्रकल्पाबाबत बोलताना सांगतो,'' मराठी माझी मातृभाषा नाही मात्र मुंबईत राहिल्याने मी बर्‍यापैकी समजू शकतो. काही खूप चांगले मराठी सिनेमे पाहण्याची संधी मला मिळाली आणि या चित्रपटाच्या कथानकाने हृदयाचा ठाव घेतला असून प्रेक्षकांनाही तो निश्चितच आवडेल''.