शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Updated :मुंबई , बुधवार, 22 एप्रिल 2015 (16:07 IST)

अनाथ मुलीच्या आयुष्याला कलाटणी देणारी डॉटर

घरात मुलीच्या असण्याचा आनंद काही ओरच असतो. तिचं हसणं, स्वैर बागडणं, रुसवे फुगवे, नटण्या मुरडण्याचा साज इतकं लोभस असतं की पहात रहावसं वाटतं. मात्र हे सगळ्याच मुलींच्या नशिबी असतं असं नाही. मायेची पांघर घालणारं घर, आई वडिलांच्या प्रेमात वाढणं आज देखील अशा अनेक अनाथ मुलीं आहेत ज्यांना हे सुख लाभत नाही. अशा मुलींना  दत्तक घेऊन त्यांना सुद्धा हक्काचं घर देण्याचा सकारात्मक विचार डॉटर सिनेमात देण्यात आला आहे. २४ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाची कथा रुचा नावाच्या अनाथ मुलीभोवती फिरते. आई वडिलांच्या मृत्यू नंतर आश्रमात आलेली रुचा कालांतराने शास्त्री परिवारातही जोडली जाते. त्यानंतर तिचा होणारा प्रवास म्हणजे डॉटर सिनेमा आहे. तन्वी प्रॉडक्शनच्या डॉ. मेधा मेहेंदळे आणि डॉ जान्हवी धामणकर निर्मित या सिनेमाचं दिगदर्शन विजू माने यांनी केला आहे. विक्रम गोखले, रीमा लागू, पद्मिनी कोल्हापुरे, उदय सबनीस, अरुण नलावडे, विनोद सिंग, आयुब खान आणि प्रमुख भूमिकेत रुचा पै आहे.  
या सिनेमाचा नुकताच संगीत अनावरणाचा सोहळा पार पडला. मिलिंद इंगळे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. के. पाश या नावाने अभिनेते किशोर कदम यांनी गीते लिहिली आहते. विशेष म्हणजे मिलिंद इंगळे आणि किशोर कदम यांनी पहिल्यांदाच हिंदी सिनेमासाठी काम केल आहे.  
सिनेमात एकूण सहा गाणी आहेत. हिंदीतील प्रसिद्ध गायक शान, कैलास खेर, साधना सरगम यांच्या सुमधुर आवाजात गाणी स्वरबद्ध केली आहेत.