शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By वेबदुनिया|

आजचा दिवस माझा: मुल्य पेरणारं राजकीय नाट्य

PR
दिग्दर्शक: चंद्रकांत कुलकर्णी
कलाकार: सचिन खेळकर, महेश मांजरेकर, आश्विनी भावे, ऋषिकेश जोशी
लेखक: अजित दळवी व प्रशांत दळवी

आजचा दिवस माझा हा चित्रपट एक राजकीय नाट्य असून जनतेच्या कल्याणासाठी प्रतिबद्ध मुख्यमंत्र्यांचा मानसिक व भावनिक संघर्ष आणि अंर्तद्वंद प्राभाविपणे टिपलेलं आहे. सामान्यजणांची आठ वर्षापासून रखडलेली कामे पूर्ण करण्याच ध्येय ठरवून काम करणार्‍या मुख्यमंत्र्यांचा आत्मसन्माम कायम राखण्याचा संघर्ष या चित्रपटात साकारण्यात आला आहे. राजकारणाच्या चिखलात मानवी संवेदना जपण्यासाठी झटणारं पात्र उभ करून या चित्रपटातून आशावाद जागवण्याचा प्रयत्न झाला आहे. यासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व लेखक द्वयी अजित व प्रशांत दळवी यांचे अभिनंदन करायला हवे.

सचिन खेळकर यांनी मुख्यमंत्र्यांची आव्हानात्मक भूमिका दमदारपणे साकारली आहे. प्रेक्षकांसाठी चित्रपटाच ट्रेलर देत आहोत...