1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By वेबदुनिया|

‘दैवत माझं मल्हारी’ लवकरच प्रदर्शित

लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र व येलमवाडी येथील प्रगतिशील शेतकरी एन.आर. शिवणगे निर्मित ‘दैवत माझं मल्हारी’ हा कौटुंबिक व ग्रामीण कथा असलेला चित्रपट लातूरसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत लवकरच प्रदर्शित होत आहे.

‘हळद रुसली कुंकू हसलं’ , ‘ओटी खणा नारळाची’ व ‘नवरा मुंबईचा’ हे तीन चित्रपट शिवणगे यांच्या नावे याआधी प्रदर्शित झाले असून टी.व्ही. चॅनलद्वारे महाराष्ट्रातील प्रेक्षक रसिकांच्या हृदयात कायम त्यांचे नाव कोरलेले आहे.

WD
एका खेडेगावातील मान-सन्मानाच्या हट्टापायी एकमेकांच्या जिवावर उठलेल्या सख्ख्या भावाची जीवन कथा या चित्रपटात आहे. लहान भाऊ मोठ्या भावांचा काटा काढण्याचे षड्यंत्र व कटकारस्थान कशापद्धतीने रचतो, त्यामध्ये तो यशस्वी होतो का? मल्हारीच मल्हारीचा शोध घेतो याचे गुपित काय? ही कहाणी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर समजेल. ‘दैवत माझं मल्हारी’ या चित्रपटाचे चित्रीकरण लातूर तालुक्यातील हिप्पळगाव, नळेगाव, येलमवाडी या परिसरात झाले असून लातूर पॅटर्नचे नाव भारत देशाबाहेरही वाढविलेले आहे. जुन्या व नव्या कलावंतांना स्थान देऊन सर्वधर्म समभावाचे प्रत्यक्षात आचरण केलेले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक राज माने असून त्यांनी अतिशय प्रभाविपणे चित्रपटाच्या कथानकाला अतिशय सूक्ष्मपणे प्रत्येक प्रसंगाला एकजीव होऊन न्याय दिलेला आहे. या चित्रपटासाठी अतिशय दमदारपणे व अचूकपणे प्रत्येक प्रसंग रसिक श्रोत्यांसमोर उभा करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आलेला आहे.

लातूर येथील अष्टपैलू तरुण लेखक व कवी म्हणून ओळखले जाणारे अनिरुद्ध जंगापल्ले यांची पटकथा, संवाद व गीते आहेत. ग्रामीण व शहरी लोकांच्या दैनंदिन जीवनातील घडणा-या घटनांचे प्रतिबिंब अस्सल मराठवाडी भाषेमधून या चित्रपटात उमटले आहे. जुन्या व नव्या कलावंतांच्या तोंडून वेधक शब्दफेक ऐकताना डोळ्याची पापणीही लवत नाही. उत्सुकता शिगेला जाते. अतिशय कसदार ग्रामीण मराठवाडी भाषेमधून दर्जेदार लिखाणाची बाजू भक्कमपणे मांडल्यामुळेच चित्रपट पाहणा-या प्रत्येक व्यक्तीला आपल्याच गावातील कथा असल्याचे जाणवते. संगीतकार युवराज मोरे यांनी अतिशय सुश्राव्य संगीत दिले आहे. त्यांचे संगीत मनाला भिडणारे, प्रसंगी मनाला हेलावून टाकणारे आहे. चित्रपटनिर्मितीची बाजू मराठवाड्यात गेली ४० वर्षे लातूरचे जे. डी. पवार (नाट्य व सिनेकलावंत) यांनी सांभाळली आहे.

‘दैवत माझं मल्हारी’ या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका करणारे चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नाट्यकलावंत बाळ धुरी यांनी खेडेगावातील कर्तबगार व्यक्तीची भूमिका साकारली आहे. प्रेमा किरण, जे. डी. पवार, विलास उजवणे, विजय कदम, संतोष चोथवे, बबन हटकर, पाशा कोतवाल, रामकृष्ण बैले, सारिका जाधव, डॉ. डी. एम. सोनवणे, माणिक सावंत, बळवंत क्षीरसागर, अनिल दरेकर, स्नेहा शिंदे, बालाजी सूळ, आदींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

नायिका छाया राठोड, नायक हर्ष आनंद यांनी अतिशय प्रभावीपणे भूमिका साकारली आहे. बालकलाकार पृथ्वीराज चव्हाण, खलनायक निवृत्ती खंदारे, हवालदार सतीश रावजादे, बंडू बोकन, कविता कदम, सुनंदा तुगावकर आदींसह सर्वच कलावंतांनी अतिशय चांगल्या प्रकारे भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे ‘दैवत माझं मल्हारी’ हा चित्रपट शंभर टक्के यशस्वी होईल असा विश्वास वाटतो.