testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कुंभमेळा आणि गुप्त दान

gupta dan
वेबदुनिया|

ND
कुंभमेळ्यादरम्यान हरिद्वार येथे गुप्तदानाची प्रथा आहे. दान प्रकट रूपात न करता गुप्त केले जाते त्याला गुप्तदान म्हणतात. प्रकट रूपात केलेल्या दानापेक्षा या दानाचे फळ 10 पटीने जास्त मिळते अशी श्रद्धा आहे. गुप्तदानासाठी कुठल्याही विधीची आवश्यकता नाही. आपल्या क्षमतेनुसार गरीबही हे दान करू शकतो. या दानाचा साक्षीदार फक्त परमेश्वर असतो. नवरा-बायकोसुद्धा या दानाबद्दल एकमेकांना सांगत नाहीत.

हरिद्वारमध्ये भाविक पाण्यात नाणी वा दाग-दागिने सोडतात. इतरांच्या नजरेआड हे दान केले जाते. दान करताना ते मनातल्या मनात वेणीमाधव म्हणजे परमेश्वराला प्रणाम करतात. काही लोक गुपचुप मुठीत ठेवून एखादी वस्तू सुपात्राला देऊन पुढे जातात. दान देणार्‍याला ते परिचयसुद्धा देत नाहीत.

सर्वस्व दान हे दान भगवान विष्णूला प्रणाम करून केले जाते. भाविक मनात एखादी इच्छा घेऊन दान करत असेल तर त्याची ती इच्छा जरूर पूर्ण होते. पण जर तो कुठलीही अपेक्षा न ठेवत दान करत असेल तर त्याच्यावर विष्णूची कृपा होते.

या दानात घर सोडून बाकी कुठलीही वस्तू दान करू शकता. उदा - कापड, भांडे, अन्न, रत्न, दाग-दागिने इत्यादी. हे दान भाविक इच्छेनुसार करतात किंवा दान घेणार्‍या व्यक्तीच्या इच्छांनुसार दान करावे. या दानात श्रद्धाळू आपल्यासाठी दोन वस्त्र सोडून बाकी सर्व काही दान करू शकतात.
हे दान करण्याअगोदर गणपतीची पूजा करावी. नंतर वेणीमाधव देवाची पूजा-अर्चना करावी. 'माधव, आनंद, विश्वेश, देवतांचे राजा तुम्हाला नमस्कार असो. कृष्ण, विष्णू, सच्चिदानंद स्वरूप, क्षीर समुद्रात निजणारे, आनंद वासुदेव तुम्हालासुद्धा आमचा नमस्कार असो. प्रभू, मी जे अनेक वस्तू एकत्रित केल्या आहेत, ते मी आपल्या इच्छेनुसार ब्राह्मणाला दान करीत आहे' अशी प्रार्थना यावेळी करावी.
या प्रार्थनेनंतर दान घेणार्‍या ब्राह्मणाची पूजा करून त्याला दे दान दिले पाहिजे. त्यानंतर आपल्या इच्छेनुसार दक्षिणा देऊन आपले दान देवाला अर्पण केले पाहिजे. हे दान केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हारीद्वारा येथे हे दान केल्याने वेणीमाधव देव प्रसन्न होतात.

धनी व निर्धन दोघेही हे दान करू शकतात. उत्तर भारताचे सम्राट हर्षवर्धन प्रत्येक 5-6 वर्षानंतर आपले सर्वस्व दान करत होते. या दानाचे वर्णन चिनी यात्री ह्यु एन त्संग यानेसुद्धा केला आहे.


यावर अधिक वाचा :

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

हिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण?

national news
हिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...

धन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा

national news
दररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...

विदर्भाचे पंढरपूर शेगाव

national news
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...

11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत

national news
सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.

राशिभविष्य