Widgets Magazine
Widgets Magazine

कुंभमेळा व भूमिदान

bhumi dan
वेबदुनिया|

ND
भूमी दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते, असे महाभारतात सांगितले गेले आहे. परिस्थितीमुळे व्यक्तीच्या हाताने कुठले ही पातक झाले असतील तर त्याने गायीच्या चामडी एवढे भूमिदान केल्यास सर्व पापे माफ होतात. या दानामुळे बरीच चांगली फळे मिळतात. राजा शासनकाळात जे काही पाप करतो ते भूमी दानामुळे नष्ट होतात.

या दानामुळे अनेक पापे नष्ट होतात. फक्त राजाच भूमी दान करू शकतो असे नाही. ज्यांच्याकडे जमिन आहे ते सुद्धा असे दान करू शकतात. हरिद्वारमध्ये भूमिदानाचे फारच महत्त्व आहे. बर्‍याच काळापासून येथील तीर्थ-पुरोहितांना श्रीमंत लोकं आणि राजे-महाराजे भूमी दान करतात. मुस्लिम शासन काळातही प्रयागच्या तीर्थ-पुरोहितांना गाव व जमीन दान म्हणून दिली आहे.
तुला दान

तुला म्हणजे वजन करून दान करणे. हे दान महादानाच्या श्रेणीत मोडले जाते. हवनानंतर ब्राह्मण पौराणिक मंत्रांचे उच्चारणं करतात. दान करणारे सोन्याचे दागिने ब्राह्मणांना दान करतात. जेवढे दान सामान्य पुरोहितांना दिले जातात त्याच्या दुप्पट यज्ञ करणार्‍यांना दिले जाते. नंतर दान देणारा पांढरे वस्त्र धारण करून परत दान देतो. तो पांढरी माळ घालून हातात फुलं घेऊन तुलेची पूजा करतो.
तुलेच्या (तराजू) रूपात विष्णूचे स्मरण करतो. नंतर तुलेला प्रदक्षिणा घालून तराजूच्या एका भागात वर चढतो, दुसर्‍या भागात लोक सोने ठेवतात. तराजूचे दोन्ही भाग समान पातळीवर येतात, तेव्हा पृथ्वीला आवाहन केले जाते. दान करणारा तराजूतून खाली उतरतो. सोन्याचा अर्धा भाग गुरुला आणि दुसरा भाग ब्राह्मणाला त्यांच्या हातावर पाणी सोडून दिला जातो. हे दान दुर्लभ आहे, फक्त धर्मशास्त्रात याचे वर्णन केले जाते.
पौराणिक कथेनुसार प्रयागच्या पवित्र भूमीवर प्रजापती ब्रह्माने सर्व तीर्थांची तुला केली होती. म्हणजे कोणते तीर्थस्थळ सर्वांत पवित्र व पुण्यप्रद असा शोध घ्यायचा होता. ब्रह्माने तराजूच्या एका भागात सर्व तीर्थ, सातही सागर आणि संपूर्ण धरतीला ठेवले होते. दुसर्‍या भागात त्यांनी तीर्थराज प्रयागाला ठेवले. अन्य तीर्थांचा भाग हलका होऊन आकाशापर्यंत पोहोचला. तीर्थराज प्रयाग मात्र जमिनीवरच टेकलेले राहिले.
ब्रह्मदेवाने घेतलेल्या परीक्षेत प्रयागच तीर्थराज असल्याची खात्री पटली. म्हणून भाविक प्रयाग येथे येऊन तुलादान करतात. जन्मभर केलेली पापे नष्ट होऊन सुख-समृद्धी येते, अशी भावना आहे. त्याचवेळी हरिद्वारमध्य केलेल्या दानाचेही वेगळे महत्त्व आहे. हरिद्वारला देवांची पवित्र भूमी मानण्यात आले आहे. तेथे होत असलेल्या कुंभमेळ्यात देवदेवताही सामील होतात, अशी श्रद्धा आहे


यावर अधिक वाचा :