Widgets Magazine
Widgets Magazine

नवेगाव बांध अभयारण्य

शनिवार, 8 ऑगस्ट 2015 (13:31 IST)

navegaon national park

नवेगाव येथील अभयारण्यात दरवर्षी जगभरातील स्थलांतरित पक्षी भेट देतात. संपूर्ण महाराष्ट्रात आढळणार्‍या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी निम्म्याहून अधिक प्रजाती नवेगाव बांध परिसरात आढळतात. नवेगावच्या हिरव्यागार टेकडय़ांङ्कध्ये हा भाग वसलेला आहे. आपली दुर्बीण घेऊन तलावाच्या नजीक असलेल्या मनोर्‍यावर टेहळणी करतायेते. सभोवतालचा परिसर न्याहाळत, विविध पक्ष्यांचे निरीक्षण करताना वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. पक्ष्यांच्या हालचाली, सवयी, वैशिष्टय़े टिपत नोंदी घेता येतात. जराही खळबळ केली की चाहूल लागून प्राण्यांनी पळ काढलाच म्हणून समजा.

हे दुर्मीळ क्षण कॅमेर्‍यात टिपल्यास आठवणींच्या देशात कधीही जाता येते. या तलावास एकीकडून मोठी भिंत बांधण्यात आली आहे. भिंतीच्या पलीकडे बघितल्यास प्रचंड जलाशयाचा साठा दृष्टीस पडतो. क्षितिजापर्यंत निळेशार पाणी धरणास सभोवताली टेकडय़ांनी वेढले असून, हिरव्यागार वनश्रीने त्या नटलेल्या आहेत. येथील जंगलात अस्वल, सांबर, चितळ, चित्ता यासारखे प्राणी आढळतात. प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य, हरणांचा पार्क व सुंदर बगिचे येथे आहेत. अभयारण्यात रात्रीचा प्रवेश दिला जात नाही, तेव्हा सकाळीच जाणे उत्तम. सगळीकडे हिरवाईने नटलेल्या टेकडय़ांच्या मध्यभागी शांत निळय़ाशार पाण्यावरुन वाहणारा थंडगार वार्‍याचा स्पर्श अनुभवत वल्हवत राहाणे यासारखे सुख नाही. नवेगाव बांध येथे जाण्यासाठी विमानाने जवळच्याच नागपूर विमानतळावर उतरावे लागते. तेथून हे अभयारण्य 150 कि.मी. अंतरावर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास देऊळगाव रेल्वेस्टेशन येथून अवघ्या दोन कि. मी. अंतरावर हे अभयारण्य आहे. तसेच नवेगावपासून हे अभयारण्य 10 कि. मी. अंतरावर आहे.
 
मृणाल सावंत Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

भटकंती

news

पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

बोर व्याघ्र प्रकल्पाची सफारी करताना येथील निसर्ग संपदा तसेच पट्टेदार वाघांसह बिबट, ...

news

तरंगती हॉटेल्स अर्थात एम. एस. सी. म्युझिका

जग खर्‍या अर्थाने पायहाचे असेल तर समुद्रामार्गे बोटीने फिरायला हवे. कोलंबसने अमेरिकेचा ...

news

इटलीतील शापित बेट

निसर्गसौंदर्याने नटलेले जगामध्ये एकाहून एक सरस व आकर्षक बेटे आहे. दरवर्षी हजारो लोक या ...

news

ट्रेकर्सना खुणावणारा दूधसागर धबधबा

कॅसलरॉक ते दूधसागर धबधबा हा एक महत्त्वाचा ट्रेकिंग रूट आहे. आपल्या परिसरातील बहुतेक ...

Widgets Magazine