महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक पन्हाळा किल्ला एक थंड हवेचे ठिकाण

Last Modified मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (18:20 IST)
थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला निसर्ग निर्मित आहे.मराठ्यांच्या करवीर राज्य संस्थापनेच्या आणि उत्तरकाळात मराठ्यांची राजधानी असणारा हा किल्ला आज एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थळ आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे

पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे.कोल्हापूर पासून हे 20 की.मी. च्या अंतरावर आहे कोल्हापूरच्या वायव्येस12 मैलावर समुद्रसपाटीपासून3127 फूट उंचीवर आणि कोल्हापुरापासून 1000 फूट उंचीवर आहे. पन्हाळगडाला पर्णालदुर्ग देखील म्हटले जाते.पन्हाळाच्या बाजूने कोंकणात जायला अनेक मार्ग आहे. इतिहासाच्या दृष्टीने आणि पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला असून महाराष्ट्रातील एकमेव किल्ला असल्यामुळे 2जानेवारी,

इ.स.1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

कसे जाता येईल ..?
चार दरवाजा मार्गे कोल्हापुरातून एस.टी. बस ने किंवा खासगी वाहनाने इथे जाता येते.ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाज्यामधून जातो. हा दरवाजा


तीन मजली आहे आणि याचे बांधकाम शिसे ओतून केले आहे.


गडावर बघण्यासारखी स्थळे :

1
राजवाडा :- हा वाडा प्रेक्षणीय असून देवघर बघण्यासारखे आहे. याला ताराबाईचा वाडा म्हणतात. आज या वाड्यात नगर पालिका कार्यालय,पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.2
सज्जा कोठी:- राजवाड्याहून पुढे गेले की ही कोठीवजा इमारत दिसते या इमारतीतच संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी सर्व कारभार बघण्यास ठेवले होते. या ठिकाणी शिवरायांची गुप्त बैठक आणि मंत्रणा चालत असे.

3
राजदिंडी :- याच वाटेचा वापर करून शिवाजी महाराज सिद्धी जोहाराच्या वेढ्यातून निघाले. ही दुर्गम वाट आहे जी गडाखाली उतरून विशाळगडावर जाते. याचा दरवाज्यातून 45 मैलांचे अंतर पार करून शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले.

4
अंबारखाना :-
याला पूर्वीचा बालेकिल्ला असे. याचा सभोवती खंदक. येथेच गंगा,यमुना, सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहे. ह्यात वरी,नागली,भात असे खंडी धान्य मावत असे. इथे सरकारी कचेऱ्या, दारुगोळ्याची कोठारे, आणि टाकसाळ होत्या.5
चार दरवाजा :- हा दरवाजा पूर्वी दिशेस असून महत्त्वाचा आणि मोक्याचा आहे.हा दरवाजा इंग्रेजांनी इ.स. 1844 मध्ये पाडून टाकला होता
पण त्याचे भग्नावशेष आज ही शिल्लक आहे. येथे" शिवा कशिदाच" पुतळा आहे.


6
सोमाळे तलाव :- गडाच्या पेठेलागून हे एक मोठे ताल आहे.याचा काठ्यांवर सोमेश्वर मंदिर आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहस्रं मावळांनी ह्या मंदिराला लक्ष चाफ्यांची फुले वाहिली होती.

7
रामचंद्रपंत अमात्य समाधी :- सोमेश्वर तलावापासून पुढे गेल्यास दोन समाध्या आहे.उजवी रामचंद्रपंत अमात्य आणि बाजूची त्यांच्या पत्नींची

8
रेडे महाल :- एक आडवी इमारत याच्या बाजूस दिसते, त्या इमारतीला रेडे महाल म्हणून ओळखले जाते. ही एक पागा आहे. या इमारतीत जनावरे बांधत असल्याने याला रेडे महाल असे म्हणतात.
9
संभाजी मंदिर :- ही छोटी गढी
व दरवाजा संभाजी मंदिर म्हटले जाते.

10 धर्मकोठी :- संभाजी मंदिराहून पुढे गेल्यावर एक झोकदार इमारत धर्मकोठी दिसते.इथे यथायोग्य दानधर्म करत असत.धान्य सरकारातून आणायचे.


11 अंदरबाव :- तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूस माळांवर तीन कमानीची,काळ्या दगडांची तीन मजली ही वास्तू आहे. याचा सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. मधला मजला चांगला ऐस पेस आहे. ताटातून बाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.

12 महालक्ष्मी मंदिर :- राजवाड्यातून बाहेर पडल्यास नेहरू उद्यानाच्या खालील बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. गडावरील हे सर्वात प्राचीन मंदिर आहे. बांधकामावरून हे मंदिर 1000 वर्षा पूर्वीचे असावे. याचे कुलदैवत राजा गंडरीत्या भोज होते.
13 तीन दरवाजा :- पश्चिमीदिशेस असणारा हा सर्वात महत्त्वाचा दरवाजा आहे. ह्याचा वरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इ.स.1676 मध्ये कोंडाजी फर्जंदने 60 मावळ्यांना घेऊन हा किल्ला जिंकला होता.

14 बाजीप्रभूंचा पुतळा :- एस टी थांब्यावरून खाली आल्यावर एका चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.

गडावर राहण्याची काय सोय आहे..?
गडाच्या जवळ राहण्यासाठी आणि खाण्यासाठी निवासस्थाने आणि हॉटेल्स आहे. इथला झुणका - भाकर सुप्रसिद्ध आहे.

येथे जाण्यासाठी काय मार्ग आहे आणि किती वेळ लागतो..?
कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने 1 तास लागतो. कोल्हापुरातील शिवाजी पुतळा बस स्टॅन्ड वरून पी.एम.टी बसने पन्हाळा तीन दरवाज्याला 1 /2 तास लागतो.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

घरात कालनिर्णयच लावतात ना

घरात कालनिर्णयच लावतात ना
मला आज पर्यंत समजलेले नाही, टी व्ही वर दररोज नवनवीन रेसिपीचा कार्यक्रम बघून सुद्धा घरी ...

दीपिका पादुकोणने केले कन्फर्म, शाहरुख खानसोबत 'पठाण'मध्ये ...

दीपिका पादुकोणने केले कन्फर्म, शाहरुख खानसोबत 'पठाण'मध्ये सिल्वहर स्क्रीनवर परतणार
सुपरस्टार शाहरुख खान यावर्षी पठाण चित्रपटासह रुपेरी पडद्यावर धमाल करणार आहे. यशराज ...

नवऱ्याची २१ कर्तव्ये

नवऱ्याची २१ कर्तव्ये
०१. कुकरखालचा गॅस तीन शिट्यांनंतर बंद करणे. ०२. उतू जाणाऱ्या दूधाखालचा गॅस धावत जाऊन ...

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, ...

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, पायाच्या हाडामध्ये झाले होते इन्फेक्शन
अभिनेता-राजकारणी कमल हसन यांना रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी ...

"लॉकडाऊन" ने किमया केली बरे !!

चिन्मयचे पप्पा : (आनंदाने) अगं, आपल्या चिन्मयचा फोन आलाय. सुनबाईला दिवस गेलेत. आपण आजी- ...